जागरुक नागरिकांमुळे उघडकीस आली सामूहिक बलात्काराची घटना; पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 13:09 IST2021-08-28T13:09:36+5:302021-08-28T13:09:57+5:30
ही घटना जनता वसाहतीत शुक्रवारी सायंकाळी घडली.

जागरुक नागरिकांमुळे उघडकीस आली सामूहिक बलात्काराची घटना; पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या
पुणे : घरातून एका तरुणीच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे गल्लीतील लोकांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना फोन केला. नागरिकांच्या जागरुकतेमुळे सामुहिक बलात्काराचा हा प्रकार उघडकीस आला असून दत्तवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना जनता वसाहतीत शुक्रवारी सायंकाळी घडली.
श्रीकांत सरोदे (वय ३६), आदित्य ऊर्फ सन्या पवार (वय १९), सुर्वेश जाधव (वय ३६) आणि आशिष मोहिते (वय १८, सर्व रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, २५ वर्षाची तरुणी भारती विद्यापीठ परिसरात राहते. ही तरुणी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेटवरुन घरी जात होती. यावेळी आरोपींपैकी एकाने तिची ओळख काढून तिला जनता वसाहतीत आणले. त्यानंतर त्याने इतरांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज आल्याने गल्लीत राहणार्यांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना कळविले. दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले व या तरुणीची सुटका करुन चौघांना अटक केली.