शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

धक्कादायक ! कुत्र्याचा वापर करुन चिंकारा हरणाची भरदिवसा शिकार; बारामती तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 16:42 IST

कोरोना लॉकडाऊनच्या काळातील वन्यप्राणी शिकारीची ही दुसरी घटना

ठळक मुद्देबारामती वनविभागामार्फत वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसार शिकार प्रकरणी गुन्हा दाखल लॉकडाऊनमधील पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार केल्याची चर्चा रंगली आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथे चिंकारा हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळातील वन्यप्राणी शिकारीची ही दुसरी घटना आहे. सोमवारी(दि ८)  घडलेली घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. भरदिवसा घडलेली ही घटना ' बिनधास्त शिकारी ' अधोरेखित करण्यास पुरेशी आहे.यापूर्वी तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे सशाची शिकार केल्याची घटना तत्पर वनअधिकाऱ्यांसह जागरूक नागरिकांमुळे उघड झाली होती. जैनकवाडी येथेदेखील जागरूक नागरिकांमुळेच हा प्रकार उघडकीस आला. शिकारप्रकरणी वन्यविभागाकडे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. लॉकडाऊनमधील पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार केल्याची चर्चा रंगली आहे.

तालुक्यात जैनकवाडी,शिर्सुफळ,पारवडी,साबळेवाडी, जराडवाडी,गोजुबावी,गाडीखेल भागात मोठे वनक्षेत्र आहे.या भागातवन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. चिंकारा हरणाची बारामती तालुक्यातील  हितिसरी घटना आहे. काही वर्षांपुर्वी सोमेश्वरनगर भागात घटलेल्या शिकारीच्या घटनेमुळे  माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पदगमावण्याची वेळ आली होती. सोमवारी (दि. ८) येथील पवारवस्ती परिसरात शिकारी कुत्र्याने पाठलाग करुन चिंकारा हरणाची शिकार केली,त्यानंतर कुत्रा बाजुला गेला. यावेळी पाठीमागुन आलेल्या एकास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने हा प्रकार पाहुन विचारणा केली.त्यावरून शिकाऱ्याने शेतकऱ्याला दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. पोलिसांनी याबाबत वनविभागाला माहिती कळविली. त्यानंतर वनविभागाने तातडीने या ठिकाणी धाव घेत मृत हरीण ताब्यात घेतले. यावेळी हरणाच्या शरीरावर जखमा देखील आढळल्या आहेत. मृत हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी उशिरा हरणाचे नियमानुसार दहन करण्यात आले. उपवनसंरक्षक श्री. लक्ष्मी सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. वनपाल त्र्यंबक जराड चौकशी करीत आहेत.याप्रकरणी प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले की, या प्रकरणी वनविभागाने तातडीने तपास चालू केला आहे.प्राथमिक तपासणीमध्ये या हरणाची शिकार केल्याची निष्पन्न झाले आहे.स्थानिकांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. बारामती वनविभागामार्फत वन्यप्राणी संरक्षण १९७२ कायद्यानुसार शिकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरणात वन्यप्राणी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची शिकार करणे चुकीचे आहे. शिकाऱ्याला दोन ते पाच वर्ष शिक्षेची तरतूद आहे.जैनकवाडी येथील शिकार प्रकरणी महत्त्वाचे धागेदारे वनविभागाच्या हाती आले आहेत. लवकरच शिकारांपर्यंत आम्ही पोहोचू.

टॅग्स :Baramatiबारामतीforestजंगलforest departmentवनविभागPoliceपोलिस