धक्कादायक ! कुत्र्याचा वापर करुन चिंकारा हरणाची भरदिवसा शिकार; बारामती तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 04:31 PM2020-06-09T16:31:42+5:302020-06-09T16:42:17+5:30

कोरोना लॉकडाऊनच्या काळातील वन्यप्राणी शिकारीची ही दुसरी घटना

Incident in Baramati taluka Chinkara deer hunting using by dog | धक्कादायक ! कुत्र्याचा वापर करुन चिंकारा हरणाची भरदिवसा शिकार; बारामती तालुक्यातील घटना

धक्कादायक ! कुत्र्याचा वापर करुन चिंकारा हरणाची भरदिवसा शिकार; बारामती तालुक्यातील घटना

Next
ठळक मुद्देबारामती वनविभागामार्फत वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसार शिकार प्रकरणी गुन्हा दाखल लॉकडाऊनमधील पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार केल्याची चर्चा रंगली आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथे चिंकारा हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळातील वन्यप्राणी शिकारीची ही दुसरी घटना आहे. सोमवारी(दि ८)  घडलेली घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. भरदिवसा घडलेली ही घटना ' बिनधास्त शिकारी ' अधोरेखित करण्यास पुरेशी आहे.
यापूर्वी तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे सशाची शिकार केल्याची घटना तत्पर वनअधिकाऱ्यांसह जागरूक नागरिकांमुळे उघड झाली होती. जैनकवाडी येथेदेखील जागरूक नागरिकांमुळेच हा प्रकार उघडकीस आला. शिकारप्रकरणी वन्यविभागाकडे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. लॉकडाऊनमधील पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार केल्याची चर्चा रंगली आहे.

तालुक्यात जैनकवाडी,शिर्सुफळ,पारवडी,साबळेवाडी, जराडवाडी,गोजुबावी,गाडीखेल भागात मोठे वनक्षेत्र आहे.या भागातवन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. चिंकारा हरणाची बारामती तालुक्यातील  हितिसरी घटना आहे. काही वर्षांपुर्वी सोमेश्वरनगर भागात घटलेल्या शिकारीच्या घटनेमुळे  माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पदगमावण्याची वेळ आली होती. सोमवारी (दि. ८) येथील पवारवस्ती परिसरात शिकारी कुत्र्याने पाठलाग करुन चिंकारा हरणाची शिकार केली,त्यानंतर कुत्रा बाजुला गेला. यावेळी पाठीमागुन आलेल्या एकास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने हा प्रकार पाहुन विचारणा केली.त्यावरून शिकाऱ्याने शेतकऱ्याला दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. पोलिसांनी याबाबत वनविभागाला माहिती कळविली. त्यानंतर वनविभागाने तातडीने या ठिकाणी धाव घेत मृत हरीण ताब्यात घेतले. यावेळी हरणाच्या शरीरावर जखमा देखील आढळल्या आहेत. मृत हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी उशिरा हरणाचे नियमानुसार दहन करण्यात आले. उपवनसंरक्षक श्री. लक्ष्मी सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. वनपाल त्र्यंबक जराड चौकशी करीत आहेत.
याप्रकरणी प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले की, या प्रकरणी वनविभागाने तातडीने तपास चालू केला आहे.प्राथमिक तपासणीमध्ये या हरणाची शिकार केल्याची निष्पन्न झाले आहे.स्थानिकांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. बारामती वनविभागामार्फत वन्यप्राणी संरक्षण १९७२ कायद्यानुसार शिकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरणात वन्यप्राणी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची शिकार करणे चुकीचे आहे. शिकाऱ्याला दोन ते पाच वर्ष शिक्षेची तरतूद आहे.जैनकवाडी येथील शिकार प्रकरणी महत्त्वाचे धागेदारे वनविभागाच्या हाती आले आहेत. लवकरच शिकारांपर्यंत आम्ही पोहोचू.

Web Title: Incident in Baramati taluka Chinkara deer hunting using by dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.