शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उद्घाटन कार्यक्रमातील गळतीपात्रावरुन मुख्यसभा वादळी होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 8:55 PM

महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे काम पूर्ण झाले नसताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी अति घाईगडबड करून उद्घाटनाचा घाट घातला होता.

ठळक मुद्देगोगावले यांच्या पत्रावरून विरोधक करणार भाजपची कोडीप्लॅस्टिक बंदीनंतर प्रशासनाकडून सुरु असलेल्या कारवाईबाबत विरोधक सत्ताधा-यांना लक्ष करणार

पुणे : महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन विस्तारीत प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला उद्घाटनच्या दिवशीच गळती लागली. तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन यावरून विरोधकाकडून गुरुवार (दि.२८) रोजी होणा-या मुख्यसभेत सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरण्यात येणार आहे. याशिवाय खागसी कंपन्यांच्या प्रस्तावावर वेळेत अभिप्राय न दिल्याने पीएमपीएलच्या कोणत्याही प्रस्तावांवर निर्णय घेऊ नका, असे भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या लेखी पत्रावरून देखील विरोधक भाजपची कोडी करण्याची शक्यता आहे. यामुळे गुरुवारी होणारी सर्वसाधारण सभा चांगली जागण्याची शक्यता आहे.    महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे काम पूर्ण झाले नसताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी अति घाईगडबड करून उद्घाटनाचा घाट घातला. यासाठी देशाचे उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु भाजपच्या कारभारामुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सभागृहाला गळती लागली अन् महापालिकेची नाच्चकी झाली. तसेच अत्यंत थाटात उद्घाटन करताना योग्या नियोजन न केल्याने अनेक नगरसेवकांना व शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना उपस्थित राहता आले नाही. यामुळे देखील अनेक सदस्य नाराज झाले असून, या भोंगळ कारभारावरून भाजपला धारेवर धरण्यात येणार आहे.     दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष यांनी महापौर मुक्ता टिळक यांना लेखी पत्र देऊन एखाद्या प्रस्तावावर निर्णय घेऊ नका असे सांगणेच अत्यंत चुकीचे असून, पक्षाच्या वतीने थेट महापालिकेच्या कारभारात ढवळाढवळ सुरु केली आहे. याचा देखील जोरदार निषेध करुन योगावले यांच्या ‘एंजेन्टगीरीवर खडाजगी होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्लॅस्टिक बंदीनंतर प्रशासनाकडून सुरु असलेल्या चुकीच्या कारवाईबाबत देखील विरोधक सत्ताधा-यांना लक्ष करणार आहेत. यामुळे गुरुवारी होणारी मुख्यसभा चांगली गाजण्याची शक्यता आहे.---------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाcongressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी