Pune: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ६५ लाख रुपयांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 09:45 AM2024-04-11T09:45:47+5:302024-04-11T09:46:45+5:30

पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि  एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.....

In the wake of the elections, cash of Rs 65 lakh was seized at two places in Pune district | Pune: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ६५ लाख रुपयांची रोकड जप्त

Pune: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ६५ लाख रुपयांची रोकड जप्त

पुणे : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि  एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

आचारसंहिता काळात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सी सर्कल जवळ ८ एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबरप्लेट असलेली आणि संशयास्पदरितीने फिरणारी  काळ्या रंगाची फॉरच्यूनर गाडी आढळून आली. पोलिसांनी अधिक तपास करून गाडीतून  १३ लाख ९० हजाराच्या  ५०० रुपयांच्या नोटा आणि ३० लाख रुपये किंमतीचे वाहनही पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केले आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत १० एप्रिल रोजी दुपारी शिरुर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना शिरुर नगर परिषद क्षेत्रातील कमान पूलाजवळ एका खाजगी वाहनातून ५१ लाख १६  हजाराची रक्कम नेली जात असल्याचे पाहणीत आढळून आले. याबाबत माहिती मिळताच भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाला याबाबत माहिती दिली. सदर रक्कम कोषागारात ठेवण्यात आली असून प्राप्तिकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.

Web Title: In the wake of the elections, cash of Rs 65 lakh was seized at two places in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.