Ashadhi Wari | पुणे मेट्रोमध्ये टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी केला विठुनामाचा जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 20:54 IST2022-06-23T20:52:58+5:302022-06-23T20:54:08+5:30
१०० वारकऱ्यांना मेट्रोची सफर

Ashadhi Wari | पुणे मेट्रोमध्ये टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी केला विठुनामाचा जयघोष
पुणे : टाळ मृदूंगाचा गजर आणि वारकऱ्यांनी विठुनामाचा केलेला जयघोष अशा भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांनी पुणेमेट्रोची सफर केली. पांडुरंग पांडुरंगच्या जयघोषाने निनादलेला हा भक्तीचा सोहळा पुणेकरांनी मेट्रोमध्ये देखील अनुभविला.
विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्यावतीने १०० वारकऱ्यांना मेट्रोची सफर घडविण्यात आली. गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाजपर्यंत वारकरी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करीत मेट्रोची सफर केली.
सुनील पांडे म्हणाले, पुण्यात विसाव्यासाठी पालखी थांबलेली असते. यावेळी खेडोपाड्यातून असंख्य वारकरी पुण्यात येतात. त्यांना पुणे मेट्रोची सफर घडवावी, आणि नवीन पुण्याची ओळख करुन द्यावी या उद्देशाने या मेट्रो सफरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०० पेक्षा अधिक वारकऱ्यांनी गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाझ पर्यंत मेट्रो प्रवास केला.