Pune | अवघ्या चार तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; नऊ लाखांचे दागिने हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:34 IST2023-03-06T16:33:39+5:302023-03-06T16:34:19+5:30

इंदापूर न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली...

In just four hours, the thieves' grins were gone; Jewelery worth nine lakhs seized | Pune | अवघ्या चार तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; नऊ लाखांचे दागिने हस्तगत

Pune | अवघ्या चार तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; नऊ लाखांचे दागिने हस्तगत

इंदापूर (पुणे) : इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी करत केवळ चार तासात दोन दागिने चोरांना अटक करुन त्यांच्याकडून ८ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. इंदापूर न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सागर अरुण राऊत (वय २० वर्षे, रा. कोष्टीगल्ली टेंभुर्णी, ता. माढा जि. सोलापूर) दादा बळी शेंडगे (वय २१ वर्षे, रा. साठेनगर ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. अशोक अंकुश व्यवहारे (रा.क्षिरसागरवस्ती माळवाडी नं. १ ता. इंदापूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. ४ मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी आपल्या घरातील साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखालील हवालदार प्रकाश माने, हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस नाईक लखन साळवे, अंमलदार नंदु जाधव, विनोद लोंखंडे,लक्ष्मण सुर्यवंशी, हवालदार शुभांगी खंडागळे, हवालदार माधुरी लडकत यांच्या  पथकाने केवळ चार तासांच्या अवधीत आरोपींना जेरबंद करुन त्यांनी चोरलेले दागिने हस्तगत केले.

Web Title: In just four hours, the thieves' grins were gone; Jewelery worth nine lakhs seized