विषबाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा

By Admin | Updated: June 25, 2015 03:22 IST2015-06-25T03:22:08+5:302015-06-25T03:22:08+5:30

बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दि. २३ जून रोजी खालेला शालेय पोषण आहार व पूजेचा शिरा यांमुळे

Improve the health of the poisoned students | विषबाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा

विषबाधित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा

जुन्नर : बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दि. २३ जून रोजी खालेला शालेय पोषण आहार व पूजेचा शिरा यांमुळे विषबाधा झाली होती. त्यातील दिघे या विद्यार्थ्याला पुण्याला हलवण्यात आले होते. उर्वरित ३१ जण, २ शिक्षिका व एक पालक यांना अ‍ॅडमिट करण्यात आले होते. त्यांची सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. पी. आर. शिंगोटे यांनी दिली.
२३ जून व २४ जून रोजी गौरी गावडे (वय १३), निकीता नायकोडी (वय ७), सर्वज्ञा डोंगरे (वय ६) यांना दाखल करण्यात आले. विठाबाई गावडे (वय ७०), जयवंताबाई गावडे (वय ५५) यांनाही उलटी, जुलाब, मळमळ अशी विषबाधेची लक्षणे दिसल्यामुळे २४ जून रोजी जुन्नर येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Improve the health of the poisoned students