शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंध; सोन्याच्या दागिन्यांची मागणी, पत्नीचा खून? पुण्यातील 'त्या' खुनाचे धक्कादायक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:25 IST

अनैतिक संबंधाच्या कारणावरून पतीबरोबर वाद झाल्यानंतर पत्नी दुसऱ्यासोबत त्याच्या घरी २ महिन्यांपासून राहत होती

पुणे : मित्राबरोबर अनैतिक संबंध असल्याने महिलेवर चाकूने वार करुन खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या नवऱ्याला अटक केली. नम्रता शैलेंद्र व्हटकर ऊर्फ नम्रता चंद्रशेखर इंगळे (१९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी शैलेंद्र प्रकाश व्हटकर (३०, रा. बकोरी, ता. हवेली) यास अटक करण्यात आली. याबाबत शाहरुख दस्तगीर पठाण (२३, रा. बालाजी सोसायटी, वाडेबोल्हाई) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख पठाण आणि नम्रता व्हटकर दोन महिन्यांपासून एकत्र राहत होते. नम्रता आणि पठाण हे नगर रस्त्यावरील एका खासगी कंपनीत कामाला होते. तेथे दोघांची ओळख झाली. दोन वर्षांपूर्वी नम्रताचे शैलेंद्र व्हटकर याच्याशी लग्न झाले होते. नम्रता आणि पठाण यांच्यात अनैतिक संबंध असल्याची कुणकुण शैलेंद्र याला लागली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. दोन महिन्यांपूर्वी नम्रता शैलेंद्रशी भांडण करून पठाण याच्याकडे राहण्यास आली होती.

लग्नात दिलेले नम्रताचे सोन्याचे दागिने शैलेंद्रकडे होते. तिने त्याच्याकडे दागिने परत करण्याची मागणी केली होती. गुरुवारी (दि. २२) पठाण कामानिमित्त शिरूर येथे गेला होता. रात्री आठच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा शैलेंद्र याला दागिने परत करण्यास सांगितले आहे, असे तिने पठाणला सांगितले. त्यानंतर शैलेंद्रच्या मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क साधला. नम्रता आणि पठाण यांना शैलेंद्रने नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई मंदिराजवळ बोलवले. पठाणचा मित्र हरीश कोळपे तेथे आला होता. शैलेंद्रने नम्रताच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. तिला जोगेश्वरी हायस्कूलजवळ त्याने बोलवले. नम्रता पठाणची दुचाकी घेऊन तेथे गेली. दोघांमध्ये तेथे वाद झाले. वादातून शैलेंद्रने नम्रतावर चाकूने वार केले. नम्रताचा ओरडण्याचा आवाज पठाणने ऐकला. त्यानंतर  पठाणने तेथे जात नम्रताला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेरावर कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या शैलेंद्र याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक खेडकर पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Wife murdered over affair, jewelry demand; husband arrested.

Web Summary : Pune: A woman was murdered by her husband due to an affair and a dispute over gold jewelry. The husband has been arrested. The victim had been living with her boyfriend after leaving her husband.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूWomenमहिलाmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट