शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्ल्यूबाबत आवश्यक उपाययोजना तातडीने करा

By admin | Updated: March 28, 2017 02:30 IST

स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना पिंपरी-चिंचवड महापालिकेने कराव्यात.

पिंपरी : स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना पिंपरी-चिंचवड महापालिकेने कराव्यात. नागरिकांच्या प्रबोधनासाठीही व्यापक प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी सांगितले.सोमवारी दुपारी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे आरोग्य मंत्र्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. अतिदक्षता विभागातील रुग्णांची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी स्वागत केले. राज्याचे आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य विभागाचे सह संचालक डॉ. एम. एस. डिग्गीकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. नितीन बेल्दीकर, उपसंचालक डॉ. एच. व्ही. चव्हाण, साथरोग अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, अतिरिक्त संचालक डॉ. पी. जी. दर्शने, वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख आदी उपस्थित होते. स्वाइन फ्लू नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना शहरातील स्वाइन फ्लूच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. या वेळी आरोग्य मंत्र्यांनी शहरामध्ये स्वाइन फ्लू नियंत्रणात आणण्याकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत सूचना देताना शहरातील स्वाइन फ्लूबाबतचा आढावा घेतला. शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या स्वाब तपासणीकरिता पॅथॉलॉजी लॅबमार्फत तपासणीसाठी २,५००/- रुपये शुल्क आकारणी करण्याच्या सूचना शहरातील पॅथॉलॉजींना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्वाइन फ्लू लसीची कमतरतापिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे महापालिका रुग्णालयात उपलब्ध असलेली स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस संपत आली आहे. लशीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. शहरात १ जानेवारीपासून अद्यापपर्यंत स्वाइन फ्लूने सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारीदेखील ४ हजार ३६२ रुग्णांची तपासणी करण्यात आली; तर ३९ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. यासह दोन जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस संपत आली असल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तीन-चार दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. मागणी करूनही अद्याप लस उपलब्ध झालेली नसून, महापालिकेचा वैद्यकीय विभाग स्वाइन फ्लू लशीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांनी वायसीएमला भेट देत स्वाइन फ्लूचा आढावा घेतला. महापालिकेकडे उपलब्ध असलेली स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस संपत आली आहे. लवकरात लवकर नवीन लस उपलब्ध व्हावी अन्यथा मोठी गैरसोय होईल, असे वैद्यकीय अधिकारी म्हणाले. शहरामध्ये स्वाइन फ्लूमुळे अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भिती आहे. या रोगावर लस उपलब्ध करावी.