घोडेगावला अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:13 IST2021-09-17T04:13:52+5:302021-09-17T04:13:52+5:30

अशिष बबन पादरे (वय ३१), उत्तम धोंडूशेट पादरे (दोघे रा. सदा बाजार पेठ जुन्नर), विठ्ठल धर्मा पारधी (वय ३३, ...

Illegal liquor seized in Ghodegaon | घोडेगावला अवैध दारू जप्त

घोडेगावला अवैध दारू जप्त

अशिष बबन पादरे (वय ३१), उत्तम धोंडूशेट पादरे (दोघे रा. सदा बाजार पेठ जुन्नर), विठ्ठल धर्मा पारधी (वय ३३, रा. गोळेगाव, जुन्नर) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघे, कारमध्ये ९२ हजार १६० रुपये किमतीची विदेशी दारूच्या ५७६ सीलबंद बाटल्या, ७ हजार २०० रुपये किमतीच्या इंपिरियल ब्ल्यू कंपनीच्या ४८ सीलबंद बाटल्या, ७ हजार ६४० रुपये किमतीच्या ४८ सीलबंद बाटल्या व ४ लाख रुपये किमतीची मोटार असे एकूण ५ लाख ७ हजार रुपयांचे साहित्य उत्तम धोंडूशेठ पादरे यांच्या सांगण्यावरून जे. के. वाईन्स घोडेगाव येथून खरेदी करून घोडेगावजवळील जुन्नर फाटा येथूज जात होते. रविवारी रात्री ८.१५ च्या दरम्यान घोडेगाव पोलिसांनी ही दारू वाहनांसह जप्त केली. तसेच घोडेगाव येथील जे. के. वाईन्स दुकानमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार घोडेगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अतिश काळे यांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नवनाथ वायाळ, पोलीस हवालदार दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, संदीप लांडे करत आहे.

Web Title: Illegal liquor seized in Ghodegaon