'मीच तुला पोलीस ठाण्यात घेऊन जातो’, पतीची मद्याच्या नशेत धोकादायक ड्रायव्हिंग, न्यायालयाने ठोठावला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:22 IST2026-03-05T19:20:31+5:302026-03-05T19:22:48+5:30

’माझ्या पतीने मद्यप्राशन केले आहे. तो मला मारहाण करण्याची शक्यता आहे. त्वरीत पोलीस मदत पाठवा’, अशी विनंती महिलेने पोलिसांकडे केली होती

'I'll take you to the police station', husband fined for dangerous driving while intoxicated, court orders | 'मीच तुला पोलीस ठाण्यात घेऊन जातो’, पतीची मद्याच्या नशेत धोकादायक ड्रायव्हिंग, न्यायालयाने ठोठावला दंड

'मीच तुला पोलीस ठाण्यात घेऊन जातो’, पतीची मद्याच्या नशेत धोकादायक ड्रायव्हिंग, न्यायालयाने ठोठावला दंड

पुणे : पत्नीशी वाद झाल्यानंतर ‘माझी तक्रार पोलिसांकडे का केली? मीच तुला पोलीस ठाण्यात घेऊन जातो’, असे सांगत मद्याच्या नशेत भरधाव कार चालवून स्वत:सह इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणा-या कार चालकाला साडेचौदा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. बाणेर पोलिसांनी या प्रकरणी कार चालकाविरुद्ध कारवाई करुन एका दिवसात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाने मद्यपी कार चालकाला दोषी ठरवून दंडाची शिक्षा सुनावली.

बाणेर भागातील एका महिलेने दि. २ फेब्रुवारी रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. ’माझ्या पतीने मद्यप्राशन केले आहे. तो मला मारहाण करण्याची शक्यता आहे. त्वरीत पोलीस मदत पाठवा’, अशी विनंती महिलेने पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी निलेश बेलदार हे मदतीसाठी बाणेर परिसरातील इमारतीत गेले. तेव्हा महिलेच्या पतीने पोलीस कर्मचारी बेलदार यांच्याशी असभ्य वर्तन केले आणि महिलेला दारुच्या नशेत कारने बाणेर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलीस कर्मचारी बेलदार यांनी कार चालकाविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मद्याच्या नशेत भरधाव कार चालविल्या प्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी संतोष केंद्रे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात एका दिवसात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील शैलजा घोडेकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मद्यपी कार चालकाला साडेचौदा हजार रुपये दंड ठोठावला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, गणेश रायकर, उपनिरीक्षक गोरक्षनाथ काळे, किसन शिंगे, प्रीतम निकाळजे, अशोक वनवे, रोहित पाथरूट, निलेश बेलदार यांनी ही कारवाई केली.

Web Title : शराबी पति का खतरनाक ड्राइविंग: पुलिस शिकायत के बाद कोर्ट ने जुर्माना लगाया।

Web Summary : पत्नी से झगड़े के बाद नशे में गाड़ी चला रहे एक पुणे के व्यक्ति ने उसे पुलिस स्टेशन ले जाने की धमकी दी। उसने लापरवाही से गाड़ी चलाकर जान जोखिम में डाली। त्वरित पुलिस कार्रवाई के बाद अदालत ने उस पर ₹14,500 का जुर्माना लगाया।

Web Title : Drunk husband's dangerous driving: Court fines him after police complaint.

Web Summary : A Pune man, driving drunk after arguing with his wife, threatened to take her to the police station. He drove recklessly, endangering lives. The court fined him ₹14,500 following swift police action and chargesheet filing.