शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाणी वाढवून हवे, तर वॉटर ऑडिट सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 02:02 IST

तीन महिन्यांची मुदत : जलसंपदा प्राधिकरणाचा आदेश

पुणे : लोकसंख्येनुसार पाण्याचा कोटा वाढवून हवा असेल, तर सर्वप्रथम वॉटर आॅडिट करून ते तीन महिन्यांच्या आत अधीक्षक अभियंता, जलसंपदा यांना सादर करण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी महापालिकेला दिला आहे. काय काय करायचे याचीही या आदेशात प्राधिकरणाने विस्ताराने माहिती दिली आहे.

आयुक्तांनी मान्यताप्राप्त सरकारी यंत्रणांकडून ही माहिती जमा करायची आहे व ती खातरजमा करून सादर करायची आहे. त्यात प्रामुख्याने लोकसंख्येचा मुद्दा आहे. मूळ लोकसंख्या, फ्लोटिंग लोकसंख्या, परिसरातील गावांची लोकसंख्या, पाण्यासाठी अवलंबून असणाऱ्या महापालिका हद्दीभोवतालच्या वसाहतींची लोकसंख्या, या सर्व लोकसंख्येला लागणारे पाणी ही माहिती महापालिकेने सादर करायची आहे. याशिवाय महापालिकेच्या हद्दीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक यासाठी किती टक्के पाणी वापरले जाते, त्यांची संख्या हेही द्यायचे आहे. शहरातील नळजोडांची संख्या, त्याचे वापरानुसार वर्गीकरण, झोपडपट्टीमधील सार्वजनिक नळकोंडाळ्यांची संख्या, त्याला लागणारे पाणी, महापालिकेच्या भोवताली टँकरद्वारे पुरवले जाणारे पाणी किती आहे, किती टँकर चालतात याबाबतही महापालिकेने जलसंपदाला कळवायचे आहे. याशिवाय आणखी बºयाच गोष्टी प्राधिकरणाने महापालिकेला करायला सांगितल्या आहेत.४शहरातील सांडपाणी शुद्धीकरणाचे सर्व प्रकल्प सुरू करणे, नव्याने तयार करणे४एकूण किती सांडपाणी रिसायकलिंग करू शकतील त्याचा अंदाज देणे४शहरातील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची संख्या, संरक्षण व शुद्धीकरण, त्यातून किती पाणी मिळू शकते४उद्याने, वॉशिंग सेंटर्स, स्वच्छतागृह, फ्लशिंग यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करणे४पाण्याची गळती कशी कमी करणार याबाबत कार्यक्रम तयार करावा.४पिण्याचे पाणी सोडून इतर बाबींसाठी ट्रीटमेंट केलेले पाणी वापरावे४जमिनीतील पाण्याचा वापर वाढवावा. त्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या प्रकल्पांची संख्या वाढवून त्यातून किती पाणी वाचवता येते त्याचा अंदाज देणे.४मैलापाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असून नदीमध्ये प्रक्रिया न करता पाणी सोडू नये.महापालिकेने थकबाकी जूनपर्यंत जमा करावी४महापालिकेने पाण्याची थकबाकी रेग्युलर जलसंपदा विभागालाद्यावी. वाद नसलेली थकबाकी ३१ मार्च २०१९ पर्यंत भरावी. वाद असलेल्या थकबाकीबाबत दोन्ही विभागांनी आपसांत एकमत करूनघ्यावे. त्यानंतर महापालिकेने ही थकबाकी जूनपर्यंत जमा करावी, असे आदेशात म्हटले आहे.महापालिकेला पाण्याचा कोटा वाढवून हवा आहे. त्याआधी महापालिकेने या सर्व गोष्टी जलसंपदाकडे सादर कराव्यात. तसेच पाणी घेता किती, त्याचा वापर किती व कसा होता, त्यापासून वसुली किती होते, गळती किती व ती कशी कमी करणार, हे सर्व कळविल्यानंतर जलसंपदा त्याचा अभ्यास करून कोटा वाढवण्याबाबत निर्णय घेईल.हा आदेश जलसंपदा व महापालिका यांच्या सुनावणीनंतर, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतरच देत असल्याचेही प्राधिकरणाने म्हटले आहे. येत्या तीन महिन्यांत या सर्व गोष्टी महापालिकेने पूर्ण करायच्या असून तसा अहवाल सादर करायचा आहे.

टॅग्स :Puneपुणे