शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

लाँग विकेंड आणि दिवाळी वॅकेशनसाठी पुण्यातील या डेस्टिनेशनचा नक्की विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 6:44 PM

दिवाळीचा मोठा विकेंड मुंबईबाहेर साजरा करायचा असेल तर पुण्यातील या ठिकाणांचा नक्की विचार करा. पुढे वाचा

ठळक मुद्देदिवाळी सर्वांकडे आनंद आणि समृध्दी घेऊन येते. दिवाळीची तयारी आपण खुप आधीपासूनच करत असतो.दिवाळीची सुट्टी आणि मुलांच्या शाळांच्या सुट्ट्या पाहून लोकांनी आपल्या लाँग सुट्ट्या प्लॅन केल्या आहेत.

यावर्षी सुदैवाने मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांना दिवाळीची ३ ते ४ दिवस सुट्टी मिळाली आहे. मुलांच्या सुट्ट्या पाहून त्यांनी इतक्यात प्लँनिंग पण सुरु केलंय. यावर्षी मुंबईबाहेर दिवाळी साजरी करायची असेल तर पुण्यातील या ठिकाणांचा नक्की विचार करा.

अंबोली

सह्याद्रीच्या रांगेतील एक हिरवागार हिल स्टेशन म्हणजे अंबोली. पुण्यापासून ३४० किंमीवर एक विलक्षण जागा आहे. ऑक्टोबरनंतर ट्रेकिंग, पर्यटन किंवा साईट-व्युसाठी लोकं येथे येतात. पावसाळ्यानंतर आंबोलीचा हिरवेगारपणा डोळ्यांचे पारणे फेडतो. आपण आपल्या शहरी धावपळीतून ब्रेक ब्रेक घेऊन दिवाळीसाठी एखादी जागा शोधत असाल तर काही काळ इकडच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

कोलाड

महाराष्ट्रातील रिव्हर राफ्टींगचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजेच कोलाड हे कुंडलिका नदीजवळ आहे. हे पुण्यापासून एक उत्कृष्ट आणि साहसी डेस्टिनेशन आहे. इथे राफ्टिंगशिवाय आपण इतर वॉटर अडव्हेंचर करु शकतो. पुणे ते कोलाड अंतर जवळपास १९४ किमी आहे.

कोयना अभयारण्य व धरण

महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य अतिशय उत्तम ठिकाण आहे जेथे तुम्ही कूटुंबासह जाऊ शकता. वन्यजीवप्रेमींसाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. तिथून जवळच पश्चिमी घाट आहेत. या अभयारण्यात अनेक प्रजातींचे प्राणी पहायला मिळतात आहे. पुणे ते कोयना अभयारण्य हे अंतर जवळपास १४७किमी आहे.

लवासा

लवासा हे पुण्यातील शांत आणि रोमँटीक स्थळ आहे. इथल्या हवेशीर रस्त्यांवरून, हिरव्यागार झाडांमधून ड्राईव्ह करण्याचा आनंद निश्चितच वेगळा आहे. इतकंच नव्हे तर तिथे तुमच्या बजेटनुसार खाण्या-पिण्यासाठीचे पर्याय उपलब्ध आहेत. पुण्यापासून अवघ्या ६० किमीवर असल्य़ाने तुम्ही हा पर्याय नक्की वापरु शकता.

दिवेगार

दिवेगार हे शांत,सुंदर, स्वच्छ समुद्र किनाऱ्यांचं ठिकाण अप्रतिम मंदिरांसठी ओळखलं जातं. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित  दिवेगर पुण्यातील एक उत्तम पर्याय आहे. जवळच श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर मिळून एक विलक्षण ट्रिप प्लॅन करता येऊ शकते. दिवेआगराचे अंतर पुण्यापासून १६० किमी आहे.

फोटो सौजन्य - india.com

टॅग्स :tourismपर्यटनIndian Festivalsभारतीय सण