शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

आमच्या रेशन कार्डावर शिक्के नाहीत तर आम्ही जगायचं नाही का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 5:23 PM

रेशन कार्डावर अन्न सुधारणा योजनेचा शिक्का नसेल तर अशांना स्वस्त धान्य देण्यास दुकानदारांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आमच्या रेशन कार्डावर शिक्के नसतील तर आम्ही जगायचं नाही का असा अगतिक सवाल गोर गरीब जनता विचारत आहे. 

पुणे : स्वस्त धान्याच्या दुकानात नव्हे फक्त दारिद्रयरेषेखालील नव्हे तर इतरही गरीब, गरजू कुटुंबांना धान्य मिळेल अशी घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्ष घोषणा आणि अंमलबजावणी यांच्यातील अंतर आता जाणवायला लागले आहे. रेशन कार्डावर अन्न सुधारणा योजनेचा शिक्का नसेल तर अशांना स्वस्त धान्य देण्यास दुकानदारांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आमच्या रेशन कार्डावर शिक्के नसतील तर आम्ही जगायचं नाही का असा अगतिक सवाल गोर गरीब जनता विचारत आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या जगण्याला जणू घरघर लागली आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व कामं बंद  झाल्यामुळे कमवायचं काय आणि खायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यात सरकारने अन्नाचा तुटवडा भासू  म्हणून रेशन दुकानावर प्रत्येकाला मोफत धान्य मिळेल अशी घोषणा केली. मुंबईत तर अशा दुकानांची यादीही जाहीर झाली. दुर्दैवाने पुण्यात मात्र असे काहीही झालेले नाही. आपल्या कार्डावर शिक्के मारून मिळतील, आपल्याला ध्यान मिळेल या खोट्या आशेपायी नागरिक रोज दुकानांचे उंबरे मात्र झिजवत आहेत.

याबाबत स्थानिक नागरिक सुनीता बांदल म्हणाल्या की, 'इथे सगळे मोलमजुरी करणारे लोक राहतात. अनेकांच्या कार्डावर शिक्का नाही. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. त्यांनी लागायचं कस हाच प्रश्न निर्माण झाला आहे. आज १५ दिवस झाले काम बंद आहे. काहीजण मदत करत आहेत पण त्यावर किती दिवस काढणार ? तिथे भाजी विक्रेत्या महिलेला अश्रू अनावर झाले होते. उसने धान्य घेऊन दिवस काढतो आहे. आम्हाला कोणाचाही आधार नाही. अनेक ठिकाणी चकरा मारूनही कोणी पुस्तकावर शिक्के मारत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान दुकानदारांनाही तशा कोणत्याही लेखी सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे जेवढे धान्य आले आहे तितकेच धान्य दिले जात आहे. हे वितरण करतानाही अधिकाधिक सोशल डिस्टन्स पाळण्याचा प्रयत्न होतो आहे.याबाबत दुकानदार काशिनाथ चव्हाण म्हणाले की, 'नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा होते मात्र आम्हाला जोवर लेखी जीआर आणि पुरवठा येईल तेव्हा आम्ही देऊ मात्र सध्या तरी आमच्या हातात काही नाही'. पुण्यात  तरी स्वस्त धान्य दुकानात हीच स्थिती असून जिल्हा प्रशासना याकडे लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे आहे. दुर्दैवाने असे झाले नाही तर मात्र प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAdhar Cardआधार कार्डGovernmentसरकार