'जर का पैसे घेत असतील तर त्याचं काय खरं नाही...' भावकीला ‘अजितदादां’चा भर सभेत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:55 IST2025-02-01T18:54:34+5:302025-02-01T18:55:15+5:30

 विहीरीमागे ७५ हजारांची मागणी करणाऱ्या भावकीला ‘अजितदादां’चा भर सभेत इशारा

If they are taking money, then it is not true... | 'जर का पैसे घेत असतील तर त्याचं काय खरं नाही...' भावकीला ‘अजितदादां’चा भर सभेत इशारा

'जर का पैसे घेत असतील तर त्याचं काय खरं नाही...' भावकीला ‘अजितदादां’चा भर सभेत इशारा

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार हे सडेतोड नेते म्हणुन ओळखले जातात.बारामतीकरांनी त्यांच्या या गुणाचा अनेकदा अनुभव घेतला आहे.शनिवारी(दि १) देखील बारामतीकरांनी हा अनुभव घेतला.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्याकडे तक्रारीबाबतचे निवेदनाचा संदर्भ देत आमची भावकी विहीरीमागे ७५ हजार रुपये मागत असल्याची तक्रार आल्याचे सांगितले.तसेच ते पैसे घेत असतील तर त्यांचे काही खरें नाही,असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी भर सभेत स्टेजवरुन संबंधितांना दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी ते एका कार्यक्रमात बोलत होते.यावेळी पवार म्हणाले, बर्हाणपुर येथे एकाने मला निवेदन दिले की, सुजय पवार कोण आहे का? पंचायत समितीकडून शेतकऱ्यांना मोफत विहीर देण्याची योजना आहे. मात्र या कामात आमची एक भावकीच पैसे मागत असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. एका विहिरीमागे ७५ हजार रुपयांची मागणी होत आहे.याबाबत ‘बीडीओं’नी नोंद घेण्याची सुचना यावेळी पवार यांनी केली.ते पुढे म्हणाले की मी एकच बाजू बघत नाही. याबाबत शहानिशा करावी लागेल. जर का पैसे घेत असतील तर त्याचं काय खरं नाही,अशा शब्दात पवार यांनी कारवाइचा इशारा दिला.तसेच घेत नसतील तर चांगल्या कामासाठी शुभेच्छा आहेत, असे पवार म्हणाले.

बारामतीत ‘डीसीएम’ कार्यालयाचे आता चाैघेजण आहेत.पण नावालाच चाैघे दिसून उपयोग नाही.काम पण चाैपटीने वाढले पाहिजे,असे उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कार्यालयाच्या अधिकार्यांना सुनावले. बारामतीची आदर्श वास्तू म्हणून 'बारामती पंचायत समिती'कडे पाहिले जाते. या ठिकाणी शासन प्रशासनाकडून काम हे तसंच व्हावे अशी अपेक्षा आहे. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, नुसता दिखावा करून उपयोग नाही. खुर्चीवर बसलेल्या माणसाने हातात घेतलेला कागदातील माणूस ओळखला पाहिजे. नुसता कागद वाचून चालत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांची कामे वेळेत आणि तत्परतेने करण्याचा सल्ला दिला. 

...‘आप मुझे बेवकुफ समजते हो क्या?
बारामती येथे एका राष्ट्रीयकृत बॅकेचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी बॅंक अधिकार्यांची ओळख करुन घेताना पवार यांंना संबंधित बॅंक व्यवस`थापकांनी पानसदृश्य काहीतरी खाल्ल्याचे लक्षात आले.आप पान खाते है क्या? असा सवाल पवार यांनी त्या अधिकार्यांना केला.अधिकार्यांनी नकार दर्शविताच ‘आप मुझे बेवकुफ समजते हो क्या? आप को रीक्वेस्ट करता हुं, कुछ गलत खाते हो तो,मत खाओ,इससे कॅन्सर वैगेरा प्राॅब्लेम हो सकती है,अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या अधिकार्याला सुनावले.
 

Web Title: If they are taking money, then it is not true...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.