शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
2
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
3
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
4
मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
5
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
6
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
7
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
8
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
9
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
10
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
11
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
12
"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
13
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
14
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
15
ट्रम्प टॅरिफचा फटका! या भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान; ५० टक्यांनी घसरला भाव
16
रितेश देशमुखसोबतच्या वादामुळे सोडला 'राजा शिवाजी' सिनेमा? रवी जाधव म्हणाले- "या सिनेमाची कल्पना माझी होती, पण..."
17
गुंतवणूकदारांची पळापळ! सलग घसरणीने बाजार हादरला; ५ कारणांमुळे बाजारात आली मंदीची लाट
18
सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम
19
ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
20
१ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 12:37 IST

जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटोही गायब करतात, कोणत्याही बाबतीत आम्हाला विश्वास घेतले जात नाही

नारायणगाव: पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा (Jan Samman Yatra) आज जुन्नर तालुक्यात आहे. सकाळी ही यात्रा नारायणगाव येथे आली असता भाजप नेत्या आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. 

यावेळी 'अजित पवार हाय हाय', 'पालकमंत्री हाय हाय..' अशी  घोषणाबाजी केली. कार्यक्रमस्थळाबाहेर रस्त्यावर ठिय्या आंदोलन आणि रास्तारोको केल्याने वाहतुकीचाही बोजवारा उडाला. दरम्यान पर्यटन जुन्नर तालुका आढावा बैठकीला भाजपा पदाधिकारी यांना आमंत्रित न केल्याने काळे झेंडे दाखवीत पवार यांच्या सह आ. अतुल बेनके यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली , या घटनेमुळे महायुतीत असलेला अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा रविवारी जुन्नर तालुक्यात पोहोचली असता नारायणगाव येथे जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले.

माध्यमाशी बोलताना आशा बुचके म्हणाल्या, पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलंल जातं आहे. पालकमंत्र्यांची ही भूमिका  खपवून घेतली जाणार नाही. मी फक्त राष्ट्रवादीचा पालकमंत्री असून महायुतीशी माझा संबंध नाही असे अजित पवारांनी जाहीर करावी अशी मागणी करत  अजित पवार पालकत्वाची भूमिका पाळत नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

अजित पवार चोरून चोरून बैठका घेतात. प्रशासनाचा गैरवापर करतात. आमदार अतुल बेनके हा राष्ट्रवादीचाच कार्यक्रम असल्याचे सांगतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटोही गायब करतात. कोणत्याही बाबतीत आम्हाला विश्वास घेतले जात नाही. त्यामुळे युती मान्य नसेल तर अजित पवार यांनी ते जाहीर करावे, अशी मागणी आशा बुचके यांनी केली. दरम्यान , भाजपा नेत्या आशाताई बुचके आणि भाजपा तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे यांच्या सह कार्यकर्ते बसस्थानका समोर रास्तारोको करण्यासाठी निघाले असता सर्वांना ताब्यात घेतले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे