शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

जर कोणी मुजोरी करत असेल तर त्याला वेळीच समज देणार; पालखी सोहळा प्रमुखांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:14 IST

जर कोणी मुजोरी, अरेरावी, उद्धटपणे वर्तन करत असेल तर आम्ही त्याला त्या त्या वेळी समज देत असतो आणि देणार पण आहोत

पुणे: आळंदी संस्थांनचे श्री निरंजन नाथ उर्फ स्वप्नील कासेकर यांनी वारकरी माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांना, माध्यम प्रतिनिधींनी तसेच वारकरी आणि भाविकांवर ओरडताना ते दिसत आहेत. त्यांच्या या वाईट वागणुकीमुळे वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणाची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनीसुद्धा दाखल घेतली आहे. जर कोणी मुजोरी करत असेल तर आम्ही त्याला त्यावेळीच समज देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.   

देखणे म्हणाले, जो काही प्रकार घडला आम्ही त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे, यात आधारवंत असतो आम्ही शिकलेलो असतो. पण जर कोणी मुजोरी करत असेल तर आम्ही त्याला त्या त्या वेळी समज देत असतो आणि देणार पण आहोत. काल जो काही प्रकार घडला त्यानंतर आम्ही बैठक घेतली, त्यानंतर दिलगिरी व्यक्त करणारी आम्ही आता ही एक बैठक घेणार आहोत. त्या बैठकीत मीडियातील हे बांधव वारीचं हे वैभव दाखवण्यात आम्हाला मदत करत असतात. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. नेमकं काय घडलं या प्रकार घडला याच आम्ही चिंतन केलं आणि आजही करणार आहोत. योगी निरंजन नाथ यांना बडतर्फ करण्याचा अधिकार आम्हाला नाही याची वेगळी व्यवस्था असते.

नेमकं काय घडलं? 

आळंदी संस्थांनचे श्री निरंजन नाथ उर्फ स्वप्नील कासेकर यांनी वारकरी माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मंदिर परिसरात पालखी आल्यानंतर कासेकर हे उद्धटपणे वर्तन करताना दिसत आहेत. पोलिसांना, माध्यम प्रतिनिधींनी तसेच वारकरी आणि भाविकांवर ओरडताना ते दिसत आहेत. पालखी भवानी पेठेत असताना हजारो भाविक, वारकरी तेथे उपस्थित असतात. पोलिसांना याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा लागतो. त्यामुळे त्यांनाही आतमध्ये थांबावे लागते. परंतु कासेकर यांनी विचित्र हातवारे करत पोलिसांवरच अरेरावी केल्याचे व्हिडिओतून दिसते आहे.

आम्ही संबंधितांशी चर्चा करू 

पुण्यात पालखी मुक्कामी आल्यानंतर घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा दखल घेतली आहे. पालखी सोहळा आनंद, उत्साह, शांतता अन् आनंद देणारा सोहळा आहे. अशा घटना अजिबात घडू नये. आम्ही संबंधित विश्वस्त यांच्याशी चर्चा करू. असं इथून पुढे होणार नाही याचीही काळजी घेण्यास सांगू असं ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीTempleमंदिरPandharpurपंढरपूरPoliceपोलिस