शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणा; अजित पवारांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:23 IST

सगळ्यांनी हाय कोर्ट, सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं असतं. सर्वानी आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे

पुणे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणांच्या घोषणेनंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. अखेर राणांनी आपली घोषणा मागे घेतली, पण त्यानंतर पोलिसांनी राणांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कालच त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे. आज अजित पवारांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.  जर कोणाला हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणावी. असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

पवार म्हणाले, सगळ्यांनी हाय कोर्ट, सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं असतं. सर्वानी आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असाल तर अजिबात चालणार नाही. कोणाला जर हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणावी. जर तुम्ही दुसऱ्याच्या दारात जाऊन म्हणत असाल तर तो त्रास देणंच आहे. हम करे सो कायदा नाही चालणार, अल्टिमेटम तर अजिबात चालणार नाही. असं नाव न घेता राणा दाम्पत्यांबरोबर पवार यांनी राज ठाकरेंनाही टोला लगावला आहे. 

सगळ्यांच्याच धार्मिक स्थळांबाबत आपण नतमस्तक होतो

साधं दुधाच्या धारा काढायला बाहेरचे लोक येतात. आपल्याकडे लोक मशीन लावतात. आज सकाळीच पोलिसांसोबत माझी बैठक झाली, नियम काय आहे की सकाळी 6 ते 10 आहे. हे सगळं चाललंय ते थांबलं पाहिजे, सगळ्यांच्याच धार्मिक स्थळांबाबत आपण नतमस्तक होतो. आपल्याकडे आठ आठ दिवस रात्री उशीरा सप्ताह चालतात. बंद करायचं तर सगळंच बंद करावं लागेल. पण आता कोणीही असो तो जर कायदा मोडत असेल तर अजिबात मी ऐकणार नाही. बोलणारे बोलतात, गॅलरीतून इकडे तिकडे बघतात, आणि बाजूला राहतात. आज आपल्यापुढे वेगळे विषय आहेत, कारण नसताना नको ते विषय लोकांच्या मनात घालायचं काम सुरुये. कोणाला भोंगे लावायचे आहेत त्यांनी किती डेसीबील मध्ये चे नियम आहेत ते बघून, परवानगी घेऊन लावावं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMNSमनसेnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे