शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शहराकडे जाण्याचे प्रमाण घटल्यास आत्महत्यांना पायबंद

By admin | Updated: October 16, 2015 01:21 IST

शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो

पुणे : शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो आणि हतबल होतो. या तरुणांचे शहराकडे जाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आत्महत्यांचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. लायन्स क्लबतर्फे शताब्दीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी परिवारांना मदतीचा हात देण्यासाठी नाना पाटेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला. या वेळी पाटेकर बोलत होते. याप्रसंगी लायन्स क्लबचे श्रीकांत सोनी, शैैलेश शहा, सतीश देसाई, श्याम अगरवाल, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे आदी उपस्थित होते.पाटेकर म्हणाले, की मन हेलावून टाकणारी घटना घडली की भावनेचा उद्रेक होतो आणि भूमिका बदलते. औैरंगाबादमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पाहिल्या आणि मन हेलावले. त्यातूनच या चळवळीची सुरुवात झाली.राजकीय घडामोडींवर, राजकारण्यांच्या नाकर्तेपणावर भाष्य करण्यापेक्षा मदतीचा हात पुढे करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. मदतीतून शेतकऱ्यांना अपंग न करता त्यांना केवळ पाठिंब्याची जाणीव आपण करून द्यायची आहे. शेतकऱ्यांना मदत केली की आपले काम संपत नाही, तर प्रक्रिया सुरू होते. या पाठिंब्याची चळवळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हायला हवी. बळीराजाच्या जमिनीत राहून श्रमदान करायला हवे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले.आयुष्यभर संपत्तीचा संचय करण्यापेक्षा तो गरजूंसाठी खर्च करायला शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा ६७ वर्षांत ते जो बदल घडवून आणू शकले नाहीत, तो आपण सर्व जण मिळून १०-१५ वर्षांमध्ये घडवून आणू शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)