मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवरून नाना पटोलेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 15:10 IST2021-07-09T15:08:21+5:302021-07-09T15:10:02+5:30
केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र, त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही.

मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवरून नाना पटोलेंचा टोला
पुणे : केंद्रातील मोदी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार सोहळा नुकताच झाला आहे. त्यामध्ये ४३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने नवीन सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोलेपुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले यांनी यावेळी विविध चालू घडामोडींवर भाष्य केले. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवर भाष्य करताना पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही. कदाचित सहकार क्षेत्राची व्यवस्था उध्वस्त करायची म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आधीपासूनच ते देशातील अनेक व्यवस्था ते उध्वस्त करत आहेतच. आणि मोदी सरकारने जर देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? असेही ते म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री उद्गाराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेना बळकट करत स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा या सूचनेवर पटोले यांनी प्रतिकिया देताना म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी तयारी कराअसे जर सांगितले असेल तर त्यात वाईट काय? मात्र, याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होतील असा नाही. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले नाही यावर बोलताना पटोले यांनी राज्य सरकारने आयोजित करण्यात आलेले हे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे होते असे सांगितले. पण आमच्या महाविकास आघाडी सरकारचे इंजिन पण आणि ड्रायव्हरपण चांगले आहे असेही पटोले यांनी सांगितले.