माझी चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा! सीआयडी चौकशीत व्ही. के. सिंग यांचा जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 06:01 IST2026-03-10T05:54:27+5:302026-03-10T06:01:16+5:30

व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची सीआयडीने तीन दिवस चौकशी केली. मात्र, नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. मात्र याबाबत सीआयडीकडून गुप्तता पाळण्यात आली आहे.

If it is my fault, punish me severely! V. K. Singh's statement in CID interrogation | माझी चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा! सीआयडी चौकशीत व्ही. के. सिंग यांचा जबाब

माझी चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा! सीआयडी चौकशीत व्ही. के. सिंग यांचा जबाब

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती जवळ झालेल्या विमान अपघातप्रकरणी पायलट सुमित कपूर याची चूक आहे. यात माझी काही चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा, असा धक्कादायक जबाब व्हीएसआर या विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी दिला आहे. त्यांची सीआयडी चौकशी सुरू आहे.

तीन दिवस चौकशी; तपशिलाबाबत गुप्तता

व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची सीआयडीने तीन दिवस चौकशी केली. मात्र, नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. मात्र याबाबत सीआयडीकडून गुप्तता पाळण्यात आली आहे.

अजित पवार विमान दुर्घटनेबाबत संशय

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आ. रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून कंपनीतल्या त्रुटी समोर आणल्या आणि हा घातपात असल्याचा आरोप केला आहे. व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी बारामती पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केले होते. व्हीएसआर कंपनीबाबत अजित पवार यांचे पुत्र जय पवार हेही आता आवाज उठवू लागले आहेत.

Web Title : दोषी होने पर मुझे दंडित करें, वी.के. सिंह ने सीआईडी जांच में कहा!

Web Summary : वीएसआर एयरलाइंस के मालिक वी.के. सिंह ने कहा कि अजित पवार के विमान दुर्घटना में पायलट सुमित कपूर की गलती थी। उन्होंने दोषी साबित होने पर कड़ी सजा देने का अनुरोध किया। रोहित पवार द्वारा उठाए गए गड़बड़ी के संदेह के बीच सीआईडी जांच जारी है।

Web Title : Punish me if guilty, V.K. Singh says in CID inquiry!

Web Summary : V.K. Singh, owner of VSR airlines, stated pilot Sumit Kapoor was at fault in the Ajit Pawar plane crash. He requested severe punishment if he is proven guilty. CID investigation continues amidst suspicion of foul play raised by Rohit Pawar.