शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

"कोरोना आटोक्यात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाही..!"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 4:27 PM

मुंबई सारख्या महानगरामध्ये कोरोना आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यात काय अडचण आहे.

ठळक मुद्देअजित पवार यांचा प्रमुख अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा इशारा  

पुणे : मुंबई सारख्या महानगरामध्ये कोरोना आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यात काय अडचण आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी असून, अधिकाऱ्यांना फ्री हॅन्ड दिल्यानंतर पुण्यात परिस्थिती का सुधारत नाही. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाही, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठे बदली करायची हे मला चांगलेच माहिती आहे. असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.पुण्यातील विधानभवन सभागृहात शुक्रवार (दि.11) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त कृष्‍ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.पुण्याचे पालकमंत्री म्हणून सर्वस्वी जबाबदारी अजित पवार यांची असल्याने त्यांना राजकीय रोषाला सामोरे जावं लागत आहे. पुण्यातील कोरोनाची साथ झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी शुक्रवारी विधान भवन या ठिकाणी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये प्रशासनातील बडे बडे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनावर प्रचंड पकड असलेले नेते म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्याच्या स्वभावानुसार त्यांनी पुण्यात मोठे बदल देखील केले आहेत. परंतु त्यानंतर देखील परिस्थिती नियंत्रणात येत नाही. बैठकीत पवार म्हणाले, कोरोना आटोक्यात न आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे. कोरोना रोखण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत यासाठी राज्य सरकार आपल्या सदैव पाठीशी आहे.मात्र अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये. मला कामाचा हिशोब द्यावा लागेल या शब्दांमध्ये अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावले. त्यांना अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने ते चिडले यापुढे जर कामात सुधारणा दिसली नाही तर मला मोठी ऍक्शन घ्यावे लागेल असा सज्जड दमही त्यांनी अधिकाऱ्यांना भरला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcommissionerआयुक्तcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका