पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह काही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील उप अभियंता सुधीर आलुरकर (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजता महापालिकेच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी हरकत अर्जाची पोच देण्याची मागणी करत मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.सुरक्षेच्या कारणास्तव उभारण्यात आलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड केल्याने निवडणूक प्रक्रियेत तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर काही उमेदवार व प्रतिनिधींनीही गोंधळ घालून परिस्थिती तणावपूर्ण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तेली करत आहेत.
Web Summary : Rupali Thombre Patil faces charges for disrupting election counting in Pune. She denies wrongdoing, accusing police of acting under pressure and vowing to fight the charges.
Web Summary : रूपाली ठोंबरे पाटिल पर पुणे में चुनाव मतगणना में बाधा डालने का आरोप है। उन्होंने आरोपों से इनकार किया और पुलिस पर दबाव में काम करने का आरोप लगाया है।