शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पुण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘आयडिया’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 1:07 PM

वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना सुचविण्याबाबत ‘लोकमत’ने पुढाकार घेत वाहतूक तज्ज्ञांचा संवाद घडवून आणला.

ठळक मुद्देआयुक्तांकडून स्वागत : आयडियाज फॉर अ‍ॅक्शन अ‍ॅक्शन नाऊ 

पुणे : वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला. त्यासाठी तज्ज्ञांची चर्चा घडवली. त्यातील अनेक मुद्दे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनाही भावले आहेत. यासंदर्भात रविवारी (दि. १४) ‘वाहतुकीचे तीन-तेरा थांबतील; हवी इच्छाशक्ती’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेले वृत्त त्यांनी ट्विटरवर टाकले आहे. त्यावर त्यांनी ‘आयडियाज फॉर अ‍ॅक्श्न, अ‍ॅक्शन नाऊ’ असे लिहित नागरिकांनाही कल्पना सुचविण्याचे आणि त्यावर कृती करण्याचे आवाहन केले आहे.  पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही नागरिकांनीही विविध पर्याय सुचविले.  वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना सुचविण्याबाबत ‘लोकमत’ने पुढाकार घेत वाहतूक तज्ज्ञांचा संवाद घडवून आणला. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांचाही चर्चेत सहभाग होता. यात विविध उपाययोजना सुचवल्या. .....* जपानमधील सिग्लन यंत्रणेचा अभ्यास करायला हवा. दुचाकीसाठी स्वतंत्र लेन करता येईल. तसेच सिग्नलजवळ दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र थांबा लाईन असावी. अनेकदा दुचाकी वाहने झेब्रा क्रॉसिंगवरच उभी असतात. 

*बीआरटी बंद करा. ही पूर्णपणे निरुपयोगी आहे. ‘लेन सिस्टीम’ करून ती वाहनचालकांनी पाळण्याचे बंधनकारक करावे.* वाहतूककोंडीवर ‘वॉकिंग प्लाझा’ हाही उत्तम पर्याय आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रामुख्याने लक्ष्मी रस्ता व दगडूशेठ गणपती मंदिराजवळ याचा विचार करायला हवा. दिल्लीमध्ये काही रस्त्यांवर तीन महिन्यांसाठी हा प्रयोग करण्यात आला आहे............अनिरुद्ध सहस्रबुद्धे : लक्ष्मी रस्त्यावर चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यास बंदी आहे. या रस्त्यावर अनेक सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. पण अनेकदा नो पार्किंग फलकाच्या समोरच वाहने उभी केली जातात. या ठिकाणी संबंधित वाहनचालकांनी महापालिकेच्या पार्किंगमध्येच वाहने उभी करण्याबाबत सूचना देणारी यंत्रणा उभी करायला हवी. ......सचिन गुजर : वाहतूक समस्येवर स्वयंशिस्त हे उत्तर आहे. मंडईजवळील पार्किंग व्यवस्था खूपच अडचणीची आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. किरण : मेट्रोची कामे आणि तोकडे रस्ते अशा परिस्थितीत बीआरटी लेन ५० टक्के जागा व्यापत आहे. जिथे जिथे बीआरटी आहे तिथे ही लेन सर्वांसाठी खुली करून दिली तर वाहतूककोंडीची समस्या कमी होईल.......के. प्रशांत : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करणे योग्य आहे. त्यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. त्यामुळे कमीत कमी कर्मचारी लागतात आणि पुरावेही मिळतात. मोठ्या रस्त्यांवर ‘रिअल टाईम ट्रॅफिक डाटा’चा वापर करून वाहतूककोंडीची वेळ, जागा आणि कारणे शोधता येतील. .....अमित पवार : विशालनगर ते हिंजवडीदरम्यान बस लेन, कार लेन आणि बाईक लेन अशी लेन सिस्टीम करायला हवी. सिग्नल येण्यापूर्वी या लेन बदलण्यास परवानगी द्यावी.नीलेश कोरडे : पादचाºयांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. बंगळुुरूमध्ये ही यंत्रणा असून त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदाही होत आहे. तिथे अलार्म बसविण्यात आले आहेत. वाहनचालकांकडूनही त्याचे पालन केले जात आहे. ......साकेत चौधरी : सिग्नलच्यालगत थांबणाºया चारचाकी वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. पीएमपी व एसटीच्या चालकांचा अनुभवही वाईट आहे. काही चालक रस्त्याच्या मधेच बस थांबवितात. यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळेही कोंडी कमी होईल. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर