Amit Shah | 'तो' गुपचूप अमित शहांच्या ताफ्यात शिरणार तोपर्यंत IB च्या टीमने त्याला हेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 20:09 IST2023-02-18T20:04:04+5:302023-02-18T20:09:27+5:30

या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले...

IB team spied on him till 'he' sneaked into Amit Shah's convoy | Amit Shah | 'तो' गुपचूप अमित शहांच्या ताफ्यात शिरणार तोपर्यंत IB च्या टीमने त्याला हेरले

Amit Shah | 'तो' गुपचूप अमित शहांच्या ताफ्यात शिरणार तोपर्यंत IB च्या टीमने त्याला हेरले

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री अमित शहांच्या ताफ्यात शिरलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले. सोमेश धुमाळ असे या संशयिताचे नाव आहे.

विविध कार्यक्रमानिमित गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आहेत. तेव्हा सोमेश धुमाळ याने आपण मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगून एका अधिकाऱ्याकडे गेला. स्थानिक पोलिसांना चकवा देणारा सोमेश धुमाळ मात्र शहांसोबत असलेल्या पोलिस यंत्रणेच्या नजरेतून सुटला नाही. त्याचा माग काढत अखेर स्थानिक पोलिसांनी त्याला गाठले. पुढील चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात नेले. ही व्यक्ती कोण आहे? ती कोणाच्या वाहनांत बसली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: IB team spied on him till 'he' sneaked into Amit Shah's convoy