'तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार...' प्रियकराच्या धमकीने पतीने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 13:57 IST2022-09-23T13:57:46+5:302022-09-23T13:57:53+5:30
पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाबाबत तिच्या प्रियकराला पतीने जाब विचारला होता

'तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार...' प्रियकराच्या धमकीने पतीने संपवलं जीवन
पिंपरी : पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाबाबत तिच्या प्रियकराला पतीने जाब विचारला. मात्र, प्रियकराने पतीलाच जीव मारण्याची धमकी दिली. त्यामुळे गावसोडून पती पत्नीला घेऊन पुण्यात राहण्यासाठी आला. मात्र, तिथे देखील पत्नीच्या प्रियकराने येत पतीला जीवे मारुन पत्नीला घेऊन जाण्याची धमकी दिली. त्यामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जुलै २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत केज, बीड आणि शिंदे वस्ती, मारुंजी येथे घटली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अजिंक्य शिवाजी घुले (रा. टाकळी, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ याच्या पत्नीसोबत आरोपी अजिंक्य याचे प्रेमसंबंध होते. याची माहिती फिर्यादीच्या भावाला मिळाल्यानंतर त्याने आरोपीला जाब विचारला मात्र, आरोपीने उलट त्यालाच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तो आपल्या पत्नीला घेऊन पुणे शहरात राहण्यासाठी आला. मात्र, आरोपीने फिर्यादीचा भाऊ राहत असलेल्या ठिकाणी आला. त्याने “एक दिवस तुझा काटा काढून तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून फिर्यादीच्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे.