शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मी नाही म्हटलं म्हणून त्याने मला...! सदाशिव पेठेतील थरारक घटनेनंतर तरुणीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 17:18 IST

मी त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं

पुणे : दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असताना पुण्याच्या सदाशिव पेठेत थरारक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. मुलीसोबत असणारा मित्रही त्यावेळी खूप घाबरला होता. या हल्ला करणाऱ्या तरुणाला पाहून तोही लांब सरसावला. त्यावेळी मुलगी जीव मुठीत धरून त्या घटनास्थळावरून पाळताना दिसून आले आहे. या घटनेनतंर मुलाला अटकही करण्यात आली आहे. अशातच जखमी मुलीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

तो माझा मित्र होता. त्याला मी नाही म्हटलं म्हणून त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझा काही दोष नसताना कॉलेजजवळ येऊन मला मारहाण करायचा. नेहमी माझा पाठलाग करत असे. त्याच्या घरच्यांना सांगितलं पण त्याच्या घरच्यांनी दुर्लक्ष केलं. घरच्यांना सांगितलं म्हणून त्याने आज माझ्यावर वार केला. हाताला लागलं आहे. डोक्याला टाके पडले आहेत. अशी प्रतिक्रिया तरुणीने दिली. 

सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला. प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. या घटनेनंतर तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिला. आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. 

या धक्कादायक घटनेत तरुणी आणि तिचा मित्र गाडीवरून जाताना दिसत आहेत. त्यावेळी अचानक आरोपी तरुण त्यांच्या शेजारी येऊन अडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचेही व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. गाडीवरचा तरुण लगेच उतरून आरोपी तरुणाला ढकलताना दिसून आले आहे. तेवढ्यात आरोपीने कोयता काढून वार करण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी मुलीबरोबर असणारा तरुण आरोपीपासून लांब गेला आहे.  आणि आरोपी कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावत जाताना दिसत आहे. पुढे जाऊन आरोपीने तरुणीवर प्राणघातक हल्लाही केला आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. हे घडत असताना आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुण जोरजोरात कोयता फिरवू लागला आहे. त्यानंतर जमावाने तरुणाला पकडून चांगलाच चोप दिल्याचे दिसून आले आहे.   

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीEducationशिक्षण