पैसे मिळाल्याने विश्वास बसला; एक रिप्लाय केला अन् ३२ लाखांचा चुना लागला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:33 IST2025-01-31T13:32:48+5:302025-01-31T13:33:02+5:30

महिलेने ३२ लाख रुपये जमा केल्यावर चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता मोबाईल बंद लागला

I believed after receiving the money; I replied and got scammed for 32 lakhs! | पैसे मिळाल्याने विश्वास बसला; एक रिप्लाय केला अन् ३२ लाखांचा चुना लागला!

पैसे मिळाल्याने विश्वास बसला; एक रिप्लाय केला अन् ३२ लाखांचा चुना लागला!

पुणे: शेअर ट्रेडिंगसाठी इच्छुक असल्याचा रिप्लाय देणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दाखल केली असून सायबर चोरट्यांविरुद्ध तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहे. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी मे महिन्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा मेसेज पाठविण्यात आला. चोरट्याने त्यांना गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्याने त्यांना एका सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये घेतले. ग्रुपमध्ये शेेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली. महिलेने चोरट्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे गुंतविले. सुरुवातीला महिलेला परतावा मिळाल्याने तिचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्याने महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. महिलेने चोरट्याच्या खात्यात ३२ लाख रुपये जमा केले. महिलेला परतावा देण्यात आला नाही. महिलेने चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार तपास करत आहेत.

Web Title: I believed after receiving the money; I replied and got scammed for 32 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.