अमाेल पालेकरांच्या मागे मी ठामपणे उभी आहे : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 19:47 IST2019-02-10T19:46:08+5:302019-02-10T19:47:35+5:30

प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी ठामपणे अमाेल पालेकरांच्या मागे उभी आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पालेकरांना पाठींबा दिला.

I am standing firmly behind Amel Palekar: Supriya Sule | अमाेल पालेकरांच्या मागे मी ठामपणे उभी आहे : सुप्रिया सुळे

अमाेल पालेकरांच्या मागे मी ठामपणे उभी आहे : सुप्रिया सुळे

पुणे : प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी ठामपणे अमाेल पालेकरांच्या मागे उभी आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पालेकरांना पाठींबा दिला.

राष्ट्रवादीच्या वतीने बारामती लाेकसभा मतदार संघातील विद्यार्थीनींना 6 हजार सायकलींचे वाटप करण्यात आले, त्यानंतर सुळे पत्रकारांशी बाेलत हाेत्या. सुळे म्हणाल्या, पालेकर असाे वा काेणीही प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. तसेच त्यांना टीका करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यामुळे पालेकरांच्या पाठीशी मी उभी आहे. उद्या आमचे सरकार आले तरी त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. पालेकरांना बाेलू न देने हा सरकारच्या विराेधात बाेलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. याचा मी जाहीर निषेध करते. 

मुंबईत शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान पालेकरांना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला हाेता. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एका निर्णयाविरोद्ध आपली भूमिका मांडली होती, त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना आपले मत मांडण्यापासून रोखले. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले. तर, भाषण लवकर संपवण्यासही सांगितले होते. 

Web Title: I am standing firmly behind Amel Palekar: Supriya Sule