Baba Adhav: माझ्या भावंडांनो प्रकृती अस्वास्थ्याने मी संपर्कात नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 07:16 PM2021-10-26T19:16:26+5:302021-10-26T19:16:41+5:30

डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितल्यामुळे सामाजिक कार्यक्रमांमधील संपर्क कमी केला असल्याचा खुलासा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केला आहे.

I am not in touch with my siblings due to health problems said baba adhav | Baba Adhav: माझ्या भावंडांनो प्रकृती अस्वास्थ्याने मी संपर्कात नाही

Baba Adhav: माझ्या भावंडांनो प्रकृती अस्वास्थ्याने मी संपर्कात नाही

Next

पुणे : डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितल्यामुळे सामाजिक कार्यक्रमांमधील संपर्क कमी केला असल्याचा खुलासा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केला आहे.

डॉ. आढाव यांनी स्वत: याबाबतचे निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यात ते म्हणतात, मी तसा व्यवस्थित आहे, मात्र वयाचे ९२ वे वर्ष सुरू आहे. सर्व हाडे ठिसूळ झाली आहेत. डॉक्टरांनी त्यामुळेच पूर्ण आराम करायला सांगितला आहे. त्यातून सामाजिक संपर्क कमी झाला आहे. हे सगळे निसर्ग नियमांनुसार होत आहे. माझ्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. मात्र, या वयात प्रतिकारशक्ती कमी होत असते, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो, काळजी म्हणूनच डॉक्टरांनी आराम सांगितला असून कोणीही भेटण्याची घाई करू नये.

Web Title: I am not in touch with my siblings due to health problems said baba adhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app