शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'मी कोणाला घाबरत नाही', गुटखा खात बेताल बडबड, इंदापूरातील 'तो' अधिकारी अखेर निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:34 IST

या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने भूमि अभिलेख खात्याची प्रतिमा मलीन झाली होती

इंदापूर : मी कोणालाही घाबरत नाही अशी मुजोरी करत कार्यालयातच गुटखा खाऊन बेताल बडबड करणाऱ्या इंदापूरातील मुख्यालय सहाय्यकाला अखेर निलंबित करण्यात आले आहे. विवेकानंद कुलकर्णी ( रा. पळसदेव, ता.इंदापूर) असे या मुख्यालय सहाय्यकाचे नाव आहे. तीन वेळा अर्ज करुन देखील मूळ प्रकरणाची नक्कल न मिळाल्याने वरिष्ठांकडे दाद मागितल्याचा राग धरुन बेताल बडबड याने केली होती. ही घटना सोमवारी ( दि.२०) दुपारी येथील भूमि अभिलेख खात्याच्या कार्यालयात घडली.   संबंधित तक्रारदारास कुलकर्णी याने,'मी पळसदेवचाच आहे. खानदानी पैसेवाला आहे. माझा साडेसतरा एकर ऊस, केळी आहे. काही ही काम निघाले तर दहा वीस लाख टाकून मोकळा होतो. गंमत म्हणून नोकरी करतो. तुम्ही साहेबाला पाठवले काय किंवा कोठे पाठवले तरी मी घाबरणार नाही' अश्या शब्दात सुनावले होते. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयात खुलमखुल्ला गुटखा खात त्यांनी ही बेताल बडबड केली होती. या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने भूमि अभिलेख खात्याची प्रतिमा पूर्ण मलीन झाली होती. अखेर विभागाने आदेश जारी करून या अधिकलाऱ्याला निलंबित केले आहे.  

 सविस्तर वृत्त असे की, संतोष महादेव रकटे (रा. शेटफळगढे, ता.इंदापूर) यांनी शेटफळगडे येथील गट नंबर २५२ मो.र.नं. ५८१७/२०२१ या मूळ प्रकरणाची संपूर्ण केस नक्कल मिळण्यासाठी भूमि अभिलेख कार्यालयाकडे तब्बल तीन वेळा अर्ज केला होता. त्यांना ती नक्कल मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी भूमि अभिलेख विभागाच्या तालुका उपअधीक्षकांशी संपर्क साधला. त्यांनी मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यांना तात्काळ नकला देण्याचा आदेश दिला. त्याचा राग आल्याने पुढचे रामायण घडले. कुलकर्णी यांनी नशापाणी केले आहे किंवा कसे खातरजमा करण्यासाठी तक्रारदाराने पोलिसांना पाचारण केल्यानंतर कुलकर्णी यांनी तेथून पोबारा केला होता. दरम्यान, या संदर्भात भूमि अभिलेख विभागाने कारवाई केली असून कुलकर्णीला निलंबित केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Indapur Official Suspended for Gutsy Behavior and Gutka Consumption

Web Summary : An Indapur land records officer was suspended after a video surfaced showing him consuming gutka and boasting about his wealth in office. He allegedly denied a land record copy to a citizen, leading to a complaint and subsequent suspension.
टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्तMONEYपैसाSocial Viralसोशल व्हायरल