शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

अजित पवार देतील तो निर्णय मान्य; माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल - दत्तात्रय भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 21:03 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणसाची पारख करणारे नेते आहेत, बारामतीकरांना चांगली पारख आहे. ते योग्य माणसाला योग्य संधी देतात

बारामती : माझ्याकडे कृषी खाते येणार याबाबतची माहिती मला माध्यमांकडूनच समजत आहे. याबाबत अधिकृत कुठेही घोषणा करण्यात आली नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आमचे नेते आहेत. यांच्याकडून मला कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील. माझ्यावर जी जबाबदारी टाकतील. तो माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे पार पाडेल, अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री भरणे यांनी दिली. बारामती येथे आयोजित कार्यक्रमानंतर मंत्री भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली. काँग्रेस (अजित पवार) गटाचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषी खातं मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.  कोकाटे यांच्याकडील कृषी खाते क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे जाणार असल्याची देखील चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री भरणे यांनी  प्रतिक्रिया दिली. भरणे म्हणाले, माझ्याकडे कृषी खाते येणार, याबद्दल मला कसलीही माहिती नाही. मी आज पुरंदर इंदापूर दौऱ्यावर होतो. मात्र अद्याप मला कुठलीही अधिकृत माहिती नाही.  बारामतीकर न सांगता खूप काही देतात, असं वक्तव्य भरणे यांनी केलं होतं. या प्रश्नावर बोलताना भरणे म्हणाले की, माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कारखान्यावर न मागता संधी दिली. 1996 साली बँकेच्या संचालक पदावर, चेअरमन पदावर संधी दिली. झेडपी अध्यक्ष, आमदार, मंत्री पदावर न सांगता संधी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणसाची पारख करणारे नेते आहेत. बारामतीकरांना चांगली पारख आहे. ते योग्य माणसाला योग्य संधी देतात. असेही भरणे यावेळी म्हणाले. कृषी खात्याची जबाबदारी तुमच्यावर दिल्यानंतर ती जबाबदारी तुम्ही कशी पेलाल? या प्रश्नावर  भरणे म्हणाले की, अद्याप कृषी खात्याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा नाही. मात्र ज्यावेळी अधिकृत घोषणा होईल. त्यावेळी याबाबत स्पष्ट भूमिका मांडता येईल,असे भरणे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारManikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीBaramatiबारामतीIndapurइंदापूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार