पतीच्या निधनानंतर चुलत दिराचा ३० वर्षीय महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 16:34 IST2022-04-19T16:33:03+5:302022-04-19T16:34:20+5:30
पुण्यातील धक्कादायक प्रकार...

पतीच्या निधनानंतर चुलत दिराचा ३० वर्षीय महिलेवर बलात्कार
पुणे : कोरोनाने पतीचे निधन झाल्यावर महिलेला आधार देण्याऐवजी दिराने लैंगिक छळ सुरू केला. व्हॉटस्ॲपवर फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी देत बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलिसांनी चुलत दिराला अटक केली आहे.
यासंदर्भात एका ३० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा या महिलेचा चुलत दीर आहे. तिच्या पतीचे कोरोनाने निधन झाले. त्याचा गैरफायदा घेत चुलत दीर रात्री-अपरात्री महिलेच्या घरी येऊन मुलांना मारहाण करीत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत होता.
शरीरसंबंध ठेवले नाही तर तुझे फोटो व्हॉटस्अॅपला टाकेन, अशी धमकी देत महिलेला मारहाण करण्यात आल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी सांगितले. जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेऊन महिलेला आरोपीने मारहाणही केल्याची घटना घडली आहे.