शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पतीने पत्नीवर चाकूने वार करुन केली आत्महत्या ; साेरतापवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 10:04 PM

पतीने पत्नीवर चाकूने वार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोरतापवाडी येथी घटली आहे.

लोणी काळभोर : धाकट्या मेहुण्याचे लग्न झालेनंतर जावयाने दुस-याच दिवशी सासुरवाडीत स्वतःच्या पत्नीवर चाकूने खुनी हल्ला करुन विहरीत उडी मारुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोरतापवाडी ता. हवेली येथील खटाटेवस्तीत रविवारी पहाटे घडला आहे. सदर प्रकारचे कारण अस्पष्ट आहे.  

सुभाष संपत झेंडे ( वय ४५, रा. दिवे ता. पुरंदर ) असे आत्महत्या केलेल्या जावायाचे नाव आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यात पत्नी, वैशाली ( वय ३५ ) ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लोणी स्टेशन येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालु आहेत. झेंडे यांच्या सासुबाई रत्नाबाई बाळु चौधरी ( वय ६०, सोरतापवाडी, खटाटे वस्ती, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी सुभाष झेंडे यांच्या पत्नीवर हल्ला केल्याचा व स्वत: आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष झेंडे हे पुणे महानगरपालिकेच्या परीवहन खात्यात चालक म्हणून काम करत होते.  झेंडे याच्या धाकटे मेहुने, अमर बाळु चौधरी यांच्या विवाहासाठी सुभाष झेंडे व पत्नी वैशालीसह तीन दिवसापुर्वी सोरतापवाडी येथे आले होते. शुक्रवारी ( ३१ मे ) अमरचा विवाह संपन्न झाला. नव वधूवरांसह सर्वजण सोरतापवाडी येथे आले. सुभाष झेंडे यांना मद्यपान व जुगाराचे व्यसन होते. यावरून वैशाली व सुभाष यांच्यात सतत कुरबुर होत असे. 

शनिवार ( १ मे ) रोजी  दुपारी झेंडे सासुरवाडीतुनच कामावर गेले होते. रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सासरचे लोक जेवून झोपी गेले. आज रविवार पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, झेंडे घरी आले त्यावेळी त्यांची पत्नी वैशाली हिने दरवाजा उघडला. त्यावेळी त्याने अचानक तिचे डावे हाताला धरून बाहेर ओढले व तिला काही कळायच्या आत चाकूने तिचे छातीवर डाव्या बाजूस वार केला. तिने त्याला ढकलून दिले. यानंतर त्याने तिचे उजवा हात, हनुवटी व नाकावर वार केले. यामुळे ती जोरात ओरडली व बेशुद्ध होऊन खाली पडली.            

वैशालीच्या आवाजाने तिची आई व दोन भाऊ यांना जाग आली. ते सर्वजण आपल्याकडे येत आहेत हे पाहून सुभाष याने वैशालीला रक्ताच्या थारोळ्यात सोडुन घरालगत असलेल्या विहरीत उडी मारली. ही गाेष्ट लक्षात येताच वैशालीचे दोन्ही भाऊ अमर व अमोल यांनी विहरीत उतरुन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र विहरीत मोठ्या प्रमाणात पाणी व अंधार असल्याने झेंडे यांना वाचवण्यात दोघांनाही अपयश आले. वैशालीला उपचारासाठी लोणी स्टेशन येथील विश्वराज रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही बाब लोणी काळभोर पोलिसांना समजताच, पोलिसांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने रविवारी सकाळी आठ वाजनेच्या सुमारास विहरीत उतरुन सुभाष झेंडे यांचा मृतदेह बाहेर काढला. व उत्तरीय तपासणी साठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवला. 

टॅग्स :MurderखूनPuneपुणेPoliceपोलिसDeathमृत्यू