शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:13 IST

बारामती : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. महेंद्र महादेव भापकर असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे ...

बारामती : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. महेंद्र महादेव भापकर असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. बारामतीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली. कारखेल गावात २०१५ मध्ये घटना घडली होती.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी होती, कारखेल गावी चेअरमन वस्ती येथे महेंद्र महादेव भापकर हे पत्नी सोनाली सोबत राहत होते. त्यांच्यात ती गरोदर असताना वाद झाल्याने ती बरेच दिवस माहेरी राहत होती. पतीने कौटुंबिक संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी दावा ही केला .त्यानंतर तिला मुलगा झाल्यानंतर त्यांच्यात तडजोडनामा झाला .त्यानुसार सासरच्या इतर नातेवाईकांपासून पती पत्नी वेगळे राहण्याचा निर्णय झाला होता.

मुळची तिखी ता. कर्जत जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असलेली सोनाली हिचा विवाह २०१२ साली झाला होता. २०१४ साली तिच्या वडलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या आजारपणात खर्च केल्याने त्यांचे थोरले जावई यांना सुमो जिप दिली .सदर जिप मला दिली नाही ,हुंडा आणला नाही व जमिनीत हिस्सा देत नाही या कारणावरुन पत्नी सोनालीचा छळ होत होता, अशी तक्रार तिच्या चुलत काकांनी वडगाव निंबाळकर येथे दिली. त्यांना खुनाच्या दिवशी राजहंस भापकर नावाच्या व्यक्तीने तुमच्या पुतणीच्या घरावर दरोडा पडला असून तिच्या कानावर, तोंडावर वार झाले आहेत, तरी त्वरित या असा फोन केला. कारखेल येथे आल्यावर तिला भोसकल्याचे व अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्याचे पाहून ती मृत झाल्याने तिची उत्तरीय तपासणी करणेत आली. सासरच्या लोकांच्या छळाची व त्यांच्यावर संशय असल्याची तक्रार तेचे चुलत काका पांडुरंग पवार यांनी वडगाव निंबाळकर येथे दिली. पोलीसांनी तपास करुन सासरच्या लोकांवर कौटुंबिक हिंसाचार व खुनाचा गुन्हा दाखल केला.

सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. संदीप ओहोळ यानी ९ साक्षीदार तपासले फिर्यादीसह मयत सोनालीची आई, पंचनाम्यातील पंच तपास अधिकारी गजानन गजभारे यांचेसह डॉक्टर दिलीप झेंडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध करताना आवश्यक बाबीबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक खटल्यांचे दाखले देण्यात आले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने महेंद्र यास दोषी ठरवत खुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

—————————————————

बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. विजयराव मोरे यानी पोलीसानी खोटा पंचनामा तयार केला असल्याचा बचाव करीत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा शाबीत होत नाही. पत्नीने त्याबाबत अगोदर कुठेच तक्रार दाखल केली नव्हती,असा बचाव केला .त्यावरुन पतीसह सासरच्या ईतर नातेवाईकांची कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

—————————————————

मुलाला मदत करण्याचे आदेश ..

आईचा खून झाला, वडिलांना शिक्षा झाली त्यामुळे लहान मुलगा शौर्य याला जिल्हा विधी सेवा समितीद्वारे नुकसानभरपाई, मदत देण्याचे आदेश देखील जिल्हा न्यायाधीश आर. आर. राठी यानी दिले आहेत .

————————————————