पतीने त्याच्या पत्नी आणि मुलाचा सांभाळ करणे आवश्यक; दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश

By नम्रता फडणीस | Updated: June 3, 2025 19:51 IST2025-06-03T19:50:54+5:302025-06-03T19:51:22+5:30

ग्नानंतर त्यांना मुलगा झाला. मात्र, घरात किरकोळ कारणांवरून वाद सुरू झाले

Husband must take care of his wife and child; Court orders to pay alimony of Rs 10,000 per month | पतीने त्याच्या पत्नी आणि मुलाचा सांभाळ करणे आवश्यक; दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश

पतीने त्याच्या पत्नी आणि मुलाचा सांभाळ करणे आवश्यक; दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश

पुणे : पतीने त्याची पत्नी व मुलाचा सांभाळ करणे आवश्यक आहे. त्यांची देखभाल आणि उदरनिर्वाहाची व्यवस्था त्याने केली पाहिजे, असे निरीक्षण नोंदवित कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. यादव यांनी लग्नानंतर पत्नी व मुलाची विचारपूसही न करणाऱ्या, तसेच कौटुंबिक जबाबदारीपासून पळवाट शोधणाऱ्या पतीला पत्नी आणि मुलाला दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

लखन आणि श्वेता (नावे बदललेली) यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना मुलगा झाला. मात्र, घरात किरकोळ कारणांवरून वाद सुरू झाले. त्यातून लखनने श्वेता आणि मुलाकडे लक्ष देणे बंद केले. चरितार्थ चालविण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने श्वेता भाड्याने खोली घेऊन दुसरीकडे राहत होती. स्वतःचा आणि मुलाचा सांभाळ करण्यासाठी तिच्याकडे कोणतेही साधन नसल्याने तिने ॲड.गायत्री कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. न्यायालयाने सादर झालेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे दरमहा १० हजार रुपये पत्नी आणि मुलाला पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Husband must take care of his wife and child; Court orders to pay alimony of Rs 10,000 per month