Pune : पत्नीच्या प्रियकराकडून पतीच्या डोक्यावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:38 IST2022-12-27T13:38:56+5:302022-12-27T13:38:56+5:30

हा प्रकार संगमवाडी गावठाणातील गणेश मंदिरासमोरील रोडवर शनिवारी रात्री घडला....

Husband hit on head by wife's lover; Filed a case pune latest crime news | Pune : पत्नीच्या प्रियकराकडून पतीच्या डोक्यावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल

Pune : पत्नीच्या प्रियकराकडून पतीच्या डोक्यावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल

पुणे : पत्नीशी प्रेमसंबंधातून वाद झाल्यानंतर प्रियकराने पतीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संगमवाडी येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कानिफनाथ ऊर्फ कानक्या कोलार (वय ४०, रा. संगमवाडी) याला अटक केली. हा प्रकार संगमवाडी गावठाणातील गणेश मंदिरासमोरील रोडवर शनिवारी रात्री घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीपासून मागील दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांची पत्नी आणि कानिफनाथ कोलार यांच्यात प्रेमसंबंध असल्याने फिर्यादी आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. फिर्यादी हे शनिवारी रात्री रिक्षातून घरी जात होते. त्यावेळी कोलार याने रिक्षा थांबवून त्यांना शिवीगाळ केली. रिक्षातून खाली खेचून त्यांच्याजवळील कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर तो पळून गेला. फिर्यादी यांना नवी सांगवीतील प्राइम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी कानिफनाथवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Husband hit on head by wife's lover; Filed a case pune latest crime news