Husband harasshment his wife for illegal relationship | तरुणीशी अनैतिक संबंध असल्याने पतीकडून पत्नीचा छळ
तरुणीशी अनैतिक संबंध असल्याने पतीकडून पत्नीचा छळ

पिंपरी : एका मुलीशी अनैतिक संबंध असल्याने पतीकडून विवाहितेचा छळ केला. तसेच सासूनेही शिवीगाळ करून क्रुर वागणूक दिली. पुणे येथील हडपसर, रामटेकडी येथे २५ फेब्रुवारी २०१८ पासून वेळोवेळी हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला रामटेकडी येथे तिच्या सासरी नांदावयास असताना पती व सासून तिचा छळ केला. महिला रामटेकडी येथे तिच्या सासरी नांदावयास असताना पती व सासून तिचा छळ केला. पतीचे एका मुलीशी अनैतिक संबंध असल्याने त्यांना महिलेची अडचण होत असल्याने पती व सासूने किरकोळ कारणांवरून फिर्यादी महिलेशी वेळोवेळी वाद घातला. शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन, छळ करून फिर्यादी महिलेला क्रुर वागणूक दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत

Web Title: Husband harasshment his wife for illegal relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.