पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने वयाच्या २९ वर्षी संपवलं जीवन; गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 20:07 IST2022-03-28T19:51:44+5:302022-03-28T20:07:01+5:30
आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पत्नीसह सासरकडील मंडळीवर गुन्हा दाखल

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने वयाच्या २९ वर्षी संपवलं जीवन; गळफास घेऊन केली आत्महत्या
राजगुरुनगर : पत्नी आणि सासरकडील नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून २९ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना खरपुडी बुद्रुक (ता खेड ) येथे घडली आहे. सतिश राजाराम भोगाडे (रा. खरपुडी बुद्रुक ता खेड ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पत्नीसह सासरकडील मंडळीवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तरुणाचा भाऊ मंगेश राजाराम भोगाडे याने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश भोगाडे त्याची पत्नी सुवर्णा सतिश भोगाडे यांची वारंवार भांडणे होत असे. तुझ्या बरोबर जबरदस्तीने लग्न लावून दिले आहे. मला तुझेबरोबर नांदायचे नाही मी तुझे नाव लावणार नाही असे म्हणून पत्नी सुवर्णा भोगाडे तसेच सासू कौशल्या बाबूराव थिगळे, सासरे बाबूराव भंगवत थिगळे, मेव्हणा गणेश बाबूराव थिगळे यांनी सतिश भोगाडे यांस नेहमी मारहाण शिवीगाळ केली. तसेच सतिश भोगाडे हा दि. २७ रोजी मुलगी आरोही हीस भेटण्यासाठी थिगळस्थळ येथे गेले असता भेटू दिले नाही शिवीगाळ दमदाटी केली व तेथून हाकलून दिले. या कारणावरून सतिश भोगाडे याने दि२८रोजी रात्री खरपुडी बुद्रुक (ता खेड ) येथील चासकमान कॅनॉलच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सतिश भोगाडे याचे आत्महत्येस पत्नी तसेच सासू , सासरा मेव्हणा जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पुढील तपास खेड पोलिस करित आहे.