पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 15:06 IST2018-12-01T15:04:07+5:302018-12-01T15:06:02+5:30

राहते घर नावावर करुन द्यावे यासाठी पत्नीकडून केलेल्या जात असलेल्या भांडणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

husband commit suicide due to wife's harassment | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुणे : राहते घर नावावर करुन द्यावे यासाठी पत्नीकडून केलेल्या जात असलेल्या भांडणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. किसन वाघमारे (वय ३५, रा़ आंबेगाव बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या सूनविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

    याबाबत पोलिसांनी सांगितले की, किसन वाघमारे यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. ते एका ड्रायव्हिंग स्कुलमध्ये गाड्या शिकविण्याचे काम करीत होते. लग्नानंतर त्यांची पत्नी सतत वेगवेगळ्या कारणावरुन त्यांच्याशी वाद घालत होते. राहते घर माझ्या नावावर करुन दे, असे तिचे म्हणणे होते. यामुळे घरात नेहमी भांडणे होत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून १६ नोव्हेंबर रोजी किसन यांनी दुपार तीनच्या सुमारास घरात कोणी नसताना सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर अंतिम संस्कार केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी सूनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस़ पी़ यादव अधिक तपास करीत आहेत.

Web Title: husband commit suicide due to wife's harassment