महिलांना हनुमान मंदिरात जाण्यास मनाई असल्याचे म्हटल्याने पती पत्नीला बांबुने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 12:53 IST2021-04-29T12:50:22+5:302021-04-29T12:53:01+5:30

भवानी पेठेतील घटना

Husband beats wife with bamboo for saying women are not allowed to go to Hanuman temple | महिलांना हनुमान मंदिरात जाण्यास मनाई असल्याचे म्हटल्याने पती पत्नीला बांबुने मारहाण

महिलांना हनुमान मंदिरात जाण्यास मनाई असल्याचे म्हटल्याने पती पत्नीला बांबुने मारहाण

ठळक मुद्देशाब्दिक भांडणाचे रुपांतर हाणामारीत

पुणे :हनुमान जयंती निमित्ताने दर्शनासाठी हनुमान मंदिरात आलेली महिला पाहून मंदिरात जाण्यास महिलांना मनाई असे असे बोलल्याने राग आलेल्या तरुणाने पती पत्नीला बांबुने मारहाण करुन जबर जखमी केले. हा प्रकार भवानी पेठेतील फकीर मोहम्मद सोसायटीखालील हनुमान मंदिरात २७ एप्रिलला रात्री ९ वाजता घडला.

याप्रकरणी विशाल तुलसीदार जेदिया (वय ४०, रा.  वानवडी) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जित नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

हनुमान जंयतीनिमित्त भवानी पेठेतील हनुमान मंदिरात जेदिया हे रात्री ९ वाजता गेले होते. यावेळी त्यांची पत्नी व बहिणीही बरोबर होत्या. त्यावेळी हनुमान मंदिरात अचानक एक बाई आत गेली. त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्या बहिणीला ‘‘ही बाई कोण आहे. हनुमान मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे,’’ असे बोलत होते. हे तेथे आलेल्या जित नावाच्या तरुणाने ऐकले. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यांच्या शाब्दिक भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. या तरुणाने फिर्यादी व त्यांची पत्नी यांना बांबुने मारहाण करुन जबर जखमी केले. खडक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सावंत अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Husband beats wife with bamboo for saying women are not allowed to go to Hanuman temple