शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी पतीस अटक

By admin | Updated: August 25, 2015 04:34 IST

माहेरच्या नातेवाइकांचा संसारात हस्तक्षेप होतो, या कारणावरून चाकण येथे पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली.

चाकण : माहेरच्या नातेवाइकांचा संसारात हस्तक्षेप होतो, या कारणावरून चाकण येथे पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली. उषा सचिन माळवे (वय २९, सध्या रा. सदगुरु अपार्टमेंट, शिक्रापूर रोड, चाकण, मूळ शिरोली बुद्रुक, ता. जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील देवराम भीमाजी सोनवणे (६४, सुखवास्तू जळवंडा, ता. जुन्नर) यांच्या फिर्यादीवरून उषाचा पती सचिन हारेश माळवे (३२, चाकण) याला अटक करण्यात आली आहे. चाकण येथे उषा आपल्या ३ वर्षांचा मुलगा व पतीसह राहत होती. मात्र, उषाचे माहेरचे नातेवाईक वारंवार तिच्या संसारात हस्तक्षेप करीत होते. या कारणावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. सचिन उषाला नेहमीच शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून उषाने रविवारी (दि. २३) दुपारी तीनच्या सुमारास घरात कुणी नसताना छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सचिनला सोमवारी अटक केली आहे़ सचिनला त्वरित अटक होत नसल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे काही वेळ चाकण ग्रामीण रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक दगडू पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली उपनिरीक्षक महेश मुंडे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)