सासरी निघालेल्या पती - पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण; दिवे घाटातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:20 IST2022-05-11T17:20:19+5:302022-05-11T17:20:40+5:30

दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी पती पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिवे घाटात घडली

Husband and wife beaten by iron rod Incidents at Dive Ghat | सासरी निघालेल्या पती - पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण; दिवे घाटातील घटना

सासरी निघालेल्या पती - पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण; दिवे घाटातील घटना

लोणी काळभोर : दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी पती पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिवे घाटात घडली आहे.   मारहाणीचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी कविता निलेश भोसुरे (वय ३४) रा. ०४५/ पाचवा मैल, धर्मनगर, वडगांव शेरी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात इसमांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (१० मे ) रोजी सकाळी ९/३० वाजण्याच्या सुमारास कविता या पतीसोबत आपल्या सासरी निरा (ता. पुरंदर) येथे आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी दुचाकी वरून निघाल्या होत्या. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारांस ते दिवे घाट मार्गे जात होते. त्यावेळी पाठीमागून दोन दुचाकी आल्या. त्यावरील दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी ॲक्टीवासमोर आडवी घातली. पुढे बसलेल्या इसमाने पती पत्नीस शिवीगाळ करून गाडी थांबवण्यास सांगितली. निलेश यांनी गाडी थांबवली. त्यावेळी दोघे विनाकारण पती पत्नीच्या अंगावर धावून गेले. हातातील लोखंडी रॉडने निलेश यांना काही एक कारण नसताना मारहाण केली.

या मारहाणीत निलेश यांना गंभीर दुखापत झाली. त्यावेळी कविता यांनी रोडने जाणाऱ्या एका रिक्षामधुन पतीस उपचारासाठी सासवड (ता. पुरंदर) येथील धन्वंतरी हॉस्पीटल येथे दाखल केले. त्यानंतर कविता यांनी उरुळी देवाची पोलीस चौकी येथे तक्रार दिली आहे. पुढील तपास उरुळी देवाची पोलीस करत आहेत. 

Web Title: Husband and wife beaten by iron rod Incidents at Dive Ghat