शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सोमवारी सकाळी होणार चक्रीवादळ अधिक सक्रीय! मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 19:38 IST

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता

ठळक मुद्देसध्या कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व सरी पडत आहेत

पुणे: अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी तयार झाले असून त्याचे सोमवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर ते अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात २४ व २५ मे रोजी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाडा व लगतच्या भागावर असलेला चक्रीय चक्रवात आता विरुन गेला आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व सरी पडत आहेत. पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 

चक्रीवादळात रूपांतर झाल्यावर २६ मेला ते पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र रविवारी अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअरपासून ५६० किमी अंतरावर होते. ओडिशातील पारादीपपासून ते ५९० किमी आणि बालासोरपासून ६९० किमी दूर आहे. तर, पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० किमी अंतरावर होते. सोमवारी सकाळी या कमी दाबाच्या क्षेत्राचे यास चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर पुढील २४ तासात त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर २६ मे रोजी त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होऊन ते पश्चिम बंगालमधील सागर आणि ओडिशाच्या पारादीप दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ जमिनीला धडकल्यानंतर बिहार, झारखंडपर्यंत त्याचा प्रवास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूरkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी