शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावर मानवी मोहीम

By admin | Updated: May 31, 2017 03:01 IST

मानवी वास्तव्यासाठी पृथ्वीनंतर मंगळ ही सर्वांत सुरक्षित जागा आहे. मंगळावर पाणी, कार्बनडायआॅक्साइड अशा गोष्टी

पुणे : ‘मानवी वास्तव्यासाठी पृथ्वीनंतर मंगळ ही सर्वांत सुरक्षित जागा आहे. मंगळावर पाणी, कार्बनडायआॅक्साइड अशा गोष्टी मूलभूत प्रमाणात असल्याने जगामधील काही कंपन्यांनी मानवाला मंगळावर पाठवण्याची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. नासादेखील इस्रोच्या सहकार्याने मंगळावर मानवी मोहीम आखण्याच्या तयारीत आहे’, असे सुतोवाच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांनी मंगळवारी केले. इस्रोच्या चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमांमुळे अंतराळ क्षेत्रात संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.पुणे मराठी ग्रंथालयातर्फे डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या ‘पृथ्वीजिज्ञासा’ या पुस्तकास स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार व अरुण करमकर यांच्या ‘पोलादी राष्ट्रपुरुष’ या पुस्तकास चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. नाईक बोलत होते. धनंजय बर्वे, अरुण करमरकर, श्रीकांत कार्लेकर, दिलीप ठकार, डॉ. अनुजा कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. नाईक म्हणाले, ‘प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांनी काही दिवसांपूर्वी पृथ्वी शंभर वर्षे टिकेल, असे विधान केले आहे. त्यामध्ये कल्पनाविलास किंवा रंजकता नसून त्यामागे अभ्यासपूर्ण संशोधन आहे. पुढील शंभर वर्षांत मनुष्याला इतर ग्रहांचा आधार घ्यावा लागू शकतो. पृथ्वीनंतर मंगळ ग्रह मनुष्यासाठी सर्वांत सुरक्षित जागा आहे. तेथील तापमान, वातावरण पृथ्वीशी मिळतेजुळते आहे. त्यामुळेच भविष्यात मंगळाकडे पर्यायी जग म्हणून पाहिले जाईल.’‘चंद्र हा उपग्रह पृथ्वीच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे. परंतु, तेथील तापमान आणि वातावरणाचा विचार केला तर मनुष्याच्या दृष्टीने ते घातक आहे. त्यानंतर सर्वांत जवळ शुक्र आहे. तेथील तापमानही पृथ्वीच्या प्रमाणात खूप जास्त आहे, असेही ते म्हणाले.अरुण करमरकर आणि श्रीकांत कार्लेकर यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद केली. ‘सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्याकडे भारतीय राजकारणाने अनेक वर्षे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे कार्य लोकांसमोर यावे, या हेतूने हे पुस्तक लिहिले असल्याचे’ करमरकर यांनी सांगितले. पृथ्वीला मनुष्याने समजून घेण्याची गरज असल्याचे कार्लेकर यांनी नमूद केले. चारूदत्त निमकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.