शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

म्हाडाच्या नव्या विक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! पुणे विभागातून ३ हजार घरांसाठी तब्ब्ल ५७ हजार नागरिकांनी केला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 3:33 PM

कोरोना संकटात सहा महिन्यात दोन वेळा घरांची सोडत, आता अर्ज आलेल्या लोकांसाठी घरांची सोडत जून अखेर पर्यंत करण्यात येणार

ठळक मुद्देपुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २ हजार ९०८ घरांची सोडत काढण्यात आली

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांच्या वतीने सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यासह पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २ हजार ९०८ घरांची सोडत काढण्यात आली. कोरोनाचे गंभीर संकट असताना देखील म्हाडाच्या घरांना सर्व स्तरातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तीन हजार घरांसाठी तब्बल ५७ हजार लोकांनी अर्ज केला आहे. आता या घरांची सोडत जून अखेर पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी सांगितले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २ हजार ९०८ घरांची सोडत काढण्यात आली. कोरोना संकट असतानाही सहा महिन्यांत दोन वेळा आणि तेही तब्बल दोन हजार पेक्षा अधिक घरांची सोडत काढण्याचा नवा विक्रम पुणे म्हाडाने केला आहे.

यात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यातील म्हाडाच्या २ हजार १५३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या ७५५ सदनिका अशा एकूण २ हजार ९०८ सदनिकेच्या अंतिम नोंदणीसाठी १३ मे पर्यंत मुदत होती. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव सदर जाहिरातील योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. घरांसाठी अर्ज करण्यास १३ जूनपर्यंत मुदत होती.  आता ही मुदत संपली असून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता जून अखेर पर्यंत ही सोडत काढण्यात येणार असल्याचे नितीन माने-पाटील यांनी येथे सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडाSocialसामाजिकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारHomeघर