पंपावर भल्या मोठ्या रांगा; अखेर पेट्रोल संपले, मुळशी तालुक्यातील 'या' भागात ३ दिवस पेट्रोल बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:22 IST2026-03-27T11:22:37+5:302026-03-27T11:22:49+5:30

पेट्रोल संपल्याने कामगार, दुग्ध, भाजीपाला व्यावसायिक, शेतमाल विक्री करणारे शेतकरी यांची अडचण झाल्याचे पाहायला मिळाले

Huge queues at the pump; Petrol finally runs out, petrol closed for 3 days in 'Ya' area of Mulshi taluka | पंपावर भल्या मोठ्या रांगा; अखेर पेट्रोल संपले, मुळशी तालुक्यातील 'या' भागात ३ दिवस पेट्रोल बंद

पंपावर भल्या मोठ्या रांगा; अखेर पेट्रोल संपले, मुळशी तालुक्यातील 'या' भागात ३ दिवस पेट्रोल बंद

घोटावडे : घोटावडे (ता. मुळशी) येथील तीन पेट्रोल पंप गुरुवारी (दि. २६) दुपारनंतर बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसाय करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मोठी अडचण निर्माण झाली. जागोजागी ट्रक, टेम्पो वाहने थांबून ठेवावी लागली. दुपारपर्यंत पेट्रोलचा साठा असेपर्यंत पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल विक्री केली. यावेळी सुद्धा भल्या मोठ्या रांगा होत्या. पेट्रोल डबा किंवा बाटलीत देणे बंद केले असल्यामुळे काही नागरिकांनी पंप कामगारांशी हुज्जत घातली. 

पेट्रोल संपल्याने कामगार, दुग्ध, भाजीपाला व्यावसायिक, शेतमाल विक्री करणारे शेतकरी यांची अडचण झाल्याचे पाहायला मिळाले. पेट्रोल पंप मालकांशी संपर्क साधला असता येणारे पेट्रोल-डिझेल मागणी जास्त असल्यामुळे उशिरा येते व आम्ही पेट्रोल उपलब्ध झाल्यावर लगेच विक्री सुरू करणार आहोत. परिसरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत. पेट्रोल विक्री अचानक बंद झाल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली.

Web Title : मुलशी में पेट्रोल संकट: पंप सूखे, तीन दिन बंदी की आशंका।

Web Summary : मुळशी के घोटावडे में पेट्रोल की कमी से पंप बंद, असुविधा। परिवहन व्यवसाय बाधित, वाहन फंसे। आपूर्ति कम होने से निवासियों को परेशानी, प्रतिबंधों पर बहस। आपूर्ति शुरू होने पर सामान्य स्थिति बहाल होगी।

Web Title : Petrol Shortage Hits Mulshi: Pumps Dry, Three-Day Closure Expected.

Web Summary : Petrol pumps in Mulshi's Ghotavade closed due to shortage, causing inconvenience. Transport businesses face disruptions, with vehicles stranded. Residents struggled as supplies dwindled, leading to arguments over restrictions. Normalcy will return when supply resumes.