रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; ३ फ्लॅट, २ दुकाने, कार जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 10:06 IST2021-03-03T10:06:19+5:302021-03-03T10:06:59+5:30

रास्ता पेठेतील आपोलो चित्रपटगृहासमोरील खाऊ गल्लीजवळील मद्रासी गणपती मंदिर आहे.

A huge fire at a building in Rasta Peth; 3 flats, 2 shops, burning cars | रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; ३ फ्लॅट, २ दुकाने, कार जळून खाक

रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; ३ फ्लॅट, २ दुकाने, कार जळून खाक

पुणे : रास्ता पेठेतील मद्रासी गणपतीजवळील एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत तळमजल्यावरील दोन दुकाने आणि पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरील ३ फ्लॅट, कार जळून खाक झाले. त्याचबरोबर वॉचमनची केबीनही जळून गेली. अग्निशामन दलाच्या जवानांनी एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग विझविली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. 

रास्ता पेठेतील आपोलो चित्रपटगृहासमोरील खाऊ गल्लीजवळील मद्रासी गणपती मंदिर आहे. या मंदिराजवळील एका ४ मजली इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाला पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी या आगीची माहिती मिळाली.  अग्निशमन दलाचे ६ बंब तातडीने घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत ही आग पहिल्या व दुसर्‍या मजल्यांवरील घरांपर्यंत पोहचली होती. आगीत वॉचमनची केबीन, तेथेच पार्क केलेली एक कार आगीत जळून खाक झाली. इमारतीच्या तळमजल्यावर एक स्पेअरपार्ट व दुसरे चप्पलचे दुकान आहे. या दुकानातून आगीला सुरुवात झाल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: A huge fire at a building in Rasta Peth; 3 flats, 2 shops, burning cars