पुण्यातील बस गॅरेजला भीषण आग, 3 गाड्या जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 00:41 IST2021-08-08T00:09:53+5:302021-08-08T00:41:54+5:30
उत्तमनगर, कोपरे गाव येथील हे गॅरेज असून मोठ्या बस गाड्यांची दुरूस्ती या गॅरेजमध्ये करण्यात येते. गॅरेजमधे अचानक आग लागून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यातील बस गॅरेजला भीषण आग, 3 गाड्या जळून खाक
पुणे - शिवणे येथील कोपरे गावात बसच्या गॅरेजला आग लागून 3 बसेस जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आगीमध्ये दोन जण गंभीर भाजले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही
उत्तमनगर, कोपरे गाव येथील हे गॅरेज असून मोठ्या बस गाड्यांची दुरूस्ती या गॅरेजमध्ये करण्यात येते. गॅरेजमधे अचानक आग लागून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून स्थानिकांची मदत मिळाली. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
पुणे - शिवने-उत्तमनगरमधील बस मॉडिफाय करणाऱ्या गॅरेजला भीषण आग, 3 वाहनं जळाल्याची माहिती pic.twitter.com/EJQGVImMje
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2021